Gunaratna Sadavarte On Jarange : 'डंके की चोटपे सांगतो, जरांगेंना 'रास्ता रोको' करता येणार नाही'; सदावर्ते बरसले!

Manoj Jarange Patil Maratha Reservation News : न्यायालयाच्या हवाल्याने सदावर्तेंनी जरांगेंना कोंडीत पकडले...
Gunaratna Sadavarte On Jarange
Gunaratna Sadavarte On JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आर-पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जरांगे यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी,' असे न्यायालयाने म्हटले आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले. तसेच जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. (Gunaratna Sadavarte On Manoj Jarange Patil Jarange)

जरांगेच्या आंदोलनावर वकील सदावर्ते म्हणाले, "जरांगेंनी रस्ते बंद करा, लोकांना वेठीस धरा हे जे काही चालवलं आहे, त्याबाबत न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. जरांगेंचे वकील थोरात यांच्या तोंडून वदवून घेतलं आहे की, कोणतंही हिंसक आंदोलन होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की जरांगेंना रास्ता रोको करता येणार नाही. हे डंके की चोट पे सांगू इच्छितो, असे म्हणत सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी जरांगेंना आव्हानच दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटलांच्या सूचना काय?

*प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे.

*कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करा.

*सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे. ज्याला या वेळेत आंदोलन करायला जमले नाही, त्याने संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करावे.

*परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली, तर त्यांना दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर सोडा.

*निष्पाप लोकांवर पोलिसांनी केसेस केल्या, तर पूर्ण गाव पोलिस स्टेशनला जाऊन बसा.

*शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार, मंत्री यांना आपल्या दारात येऊन देऊ नका.

*निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका.

*मराठा आरक्षण (Maratha Resevration) मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये. निवडणूक घेतली आणि प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर ताब्यात घ्या.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com