Gunratna Sadavarte On State Transport Bank Victory : स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

State Transport Co Operative Bank Election : सदावर्ते यांच्या पॅनलनं पवारांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.
Gunratna Sadawarte
Gunratna SadawarteSarkarnama

Mumbai : महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑप बॅंकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवतानाच १९ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पवार पुरस्कृत कामगार संघटनेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेवरील पवारांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत धक्कादायकरित्या पराभव केला आहे.

अॅड. गुणवरत्न सदावते यांच्या पॅनल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत सदावर्ते यांनी पवारांना पराभवाचा धक्का देत विजय खेचून आणला आहे. या विजयानंतर आता सदावर्ते यांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Gunratna Sadawarte
K.Chandrasekhar Rao : 'बीआरएसकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'; आघाडीने घेतला धसका? पवार, पटोले, राऊत म्हणाले...

स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर अॅड.गुणरत्न सदावर्ते(Gunratna Sadavarte) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार, उध्दव ठाकरेंसह आघाडीच्या नेतेमंडळींवर जोरदार हल्लाबोल केला. सदावर्ते म्हणाले, ही निवडणुक सामान्य कष्टकर्यांसाठी होती. या आधी शरद पवारांच्या कालात राजसत्ता कधीच सामान्य कष्टकरी वाहन चालकांच्या हाती नव्हती. पण आम्ही फिरवाफिरवी नाही करत तर थेट तडकाच देतो. सहकार क्षेत्र, आशिया खंडातील सगळ्यात मोठी बॅंक असलेल्या या बॅकेत शरद पवारांनी सर्वसामान्य जनतेनं शरद पवारांना धडा शिकवला असल्याचं सदावर्ते म्हणाले.

या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. सदावर्ते यांनी शरद पवार यांचे 15 वर्ष असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँके(State Transport Co Operative Bank) वरील पॅनलचा पराभव केला आहे. सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, डंके की चोट पे यांसारख्या घोषणाबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केला.

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान पार पडलं होतं. सोमवारी(दि.२६) मुंबईत मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते पॅनलमध्ये आणि शरद पवार(Sharad Pawar) पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस होती. पण या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 19 संचालकपदांच्या जागा सदावर्ते पॅनलने खिशात घातल्या आहे. मागील 15 वर्षांपासून स्टेट बँकेवर कामगार संघटनेचं वर्चस्व होतं. पण यंदा या निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलने मुसंडी मारली. याआधीही एसटी पतसंस्थेच्या निवडणुकीतही गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला होता. आता बँकेच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे.

Gunratna Sadawarte
Sandipan Bhumre Audio News : माझ्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, `त्या` कार्यकर्त्याचा भुमरेंवर आरोप...

ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनांनी निवडणुकीत सर्वाधिक मत घेतली. या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेना हे पॅनल सुद्धा आखाड्यात होतं. मात्र, या पॅनललाही सदावर्तेंच्या पॅनलने धक्का दिला. त्यामुळे एकाच वेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पॅनलचा पराभव केला आहे.

मागील वर्षी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयीन बाजू लढली होती. त्यावेळी देखील या संपूर्ण आंदोलनात सदावर्ते यांनी शरद पवार यांनाच टार्गेट केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शरद पवार यांच्यामुळेच राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचे टीका देखील अनेकदा सदावर्ते यांनी केले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या घरासमोर काही आंदोलन यांनी आंदोलन केले. त्यावेळेस सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती आणि काही दिवस त्यांना कारागृहातच राहावे लागले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com