Gunratna Sadavarte Photo Viral : गुणरत्न सदावर्तेंच्या दोन्ही पायाला, हाताला प्लास्टर; हाणामारीनंतरचा रुग्णालयातील फोटो व्हायरल

Gunratna Sadavarte Hospital Shivsena : शिवसैनिक आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता. आता सदावर्ते रुग्णालयात दाखल असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Advocate Gunratna Sadavarte’s hospital photo with hand and leg plaster goes viral on social media.
Advocate Gunratna Sadavarte’s hospital photo with hand and leg plaster goes viral on social media.sarkarama
Published on
Updated on

Gunratna Sadavarte News : मुंबई एसटी को-ओपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल (बुधवारी) मोठा राडा झाला. अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. दरम्यान, या घटनेच्या काही तासानंतरच सदावर्ते यांच्या दोन्ही दोन्ही पाय आणि दोनही हाताला प्लास्टर केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये सदावर्ते हे रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या दोन्ही हात आणि पायाला प्लॅस्टर असून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलेली आहे. त्यांच्या पत्नी अ‍ॅड.जयश्री पाटील या देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. दरम्यान, या फोटोच्या सत्यतेची पुष्टी 'सरकारनामा' करत नाही.

या फोटोवर नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे झाले ते अयोग्य आहे असे काही नेटकरी म्हणत आहेत तर, या मारहाणीनंतर सदावर्तेंना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले असून ते नाटक करत असल्याचेही म्हटले आहे. राज ठाकरेंसोबत फोटो असलेल्या आनंद सोनी यांच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी हा फोटो खरा नसून एआयच्या माध्यमातून तयार केला असल्याचे म्हटले आहे.

Advocate Gunratna Sadavarte’s hospital photo with hand and leg plaster goes viral on social media.
Mumbai ST Bank : मुंबई एसटी बँकेत तुफान राडा, सदावर्ते अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हाणामारी; नेमकं काय घडलं ?

हल्ल्यामागे सदावर्तेंच्या हात...

एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी सांगितले की, एसटी बँकेत कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला आहे. आम्ही त्याची तक्रार सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे केली आहे. कोट्यवधीचा गैरव्यवहार हा सदावर्ते हे करत असून बैठीत झालेला गोंधल आणि हल्ल्यामागे सदावर्तेंचा हात आहे.

महिलांचा अपमान

एसटी बँकेचे सदावर्ते पॅनलचे संचालक संजय घाटगे यांनी सांगितले की, बैठकीत विरोधी संचालकांनी महिलांचा अपमान केला. मंगळसुत्र तोडण्याचा प्रयत्न केला. कपडे फाडण्यात आले, जातीवाचक बोलले गेले. वारंवार महिलांचा अपमान करण्यात आला.

Advocate Gunratna Sadavarte’s hospital photo with hand and leg plaster goes viral on social media.
Hindi Ban Act: तामिळनाडूत आता हिंदी भाषेतील होर्डिंग्ज, सिनेमे, गाण्यांवरही कायद्यानं येणार बंदी? सरकार आणणार नवं विधेयक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com