Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : 'अब तेरी नहीं चलेगी'! मनोज जरांगेंना उद्देशून सदावर्ते शरद पवार, उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

Maratha Reservation Vs OBC Reservation : संविधान संमंत नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिले जाणार नाही.

Maharashtra Political News : राज्यात मराठा समाजाला 'एसईबीसी'तून 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र ते मान्य नाही, असे म्हणत आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सरकारला धारेवर धरले आहे.

तर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाके यांनीही बाह्या मागे सारल्या आहेत. परिणामी राज्यात सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावर कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी यापुढे जरांगेंचे काहीही चालणार नाही, असा इशारा दिला आहे.

सदावर्ते Gunratna Sadavarte म्हणाले, हिंदू नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतो. तो भारताच्या संविधानावर विश्वास ठेवतो. आज जे सलोख्याची भाषा करतात, त्यासाठी संविधानाला तिलांजली द्यायची का? संविधानाला निकाली काढायचे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

संविधान संमंत नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिले जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar, शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी खुशाल आपल्या गोष्टी कराव्यात, असे म्हणत सदावर्तेंनी थेट मनोज जरांगे यांच्यावर एकेरी भाषेत तोफ डागली.

Gunratna Sadavarte
Balwant Wankhede Oath : अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंची मराठीत शपथ अन् 'जय भीम-जय शिवराय'ने शेवट...

जरांगे Manoj Jarange Patil तुला मी सांगत आहे, दंड थोपटणे बंद कर. आम्हीही संविधानाच्या ताकदीने तयार आहोत. संविधानाच्या ताकदीने आम्ही मांड्या थोपटतो. त्यामुळे येणाऱ्या काळात 'जरांगे की नहीं चलेगी', असे म्हणत सदावर्तेंनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे.

राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम जरांगे करत असल्याचा आरोपही सदावर्तेंनी केला. तो असा माणूस आहे जो समाजात नुसती तेढ निर्माण करत नाही, तर संविधानालाही हारताळ फासण्याचे काम करतो.

तो बॉलप्रमाणे गोलगोल आहे. तिकडून येणाऱ्या सूचनेनुसार जसा पाहिजे तसा गोलंदाजी करतो. या गोलंदाजीची खेळापुरतीच चालते, संविधान बदलण्यासाठी नाही, असा टोलाही सदवर्तेंनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Gunratna Sadavarte
Rahul Gandhi : अध्यक्षांच्या खुर्चीमागे उभ्या असलेल्या मार्शलला दिला मान! राहुल यांचा अनोखा अंदाज...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com