Rahul Gandhi : अध्यक्षांच्या खुर्चीमागे उभ्या असलेल्या मार्शलला दिला मान! राहुल यांचा अनोखा अंदाज...

Lok Sabha Session 2024 Congress Leader Rahul Gandhi took Oath : राहुल गांधी यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन लोकसभा सदस्यत्वाची मंगळवारी शपथ घेतली.  
Rahul Gandhi took Oath
Rahul Gandhi took OathSarkarnama

New Delhi : लोकसभेत मंगळवारी अनेक खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेताना हातात संविधानाची प्रति घेतली. नारेबाजी केली. शपथ घेतल्यानंतर बहुतेक जण लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांकडे जाऊन त्यांच्याशी हात मिळवत होते, त्यांना नमस्कार करत होते. इथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे वेगळेपण दिसून आले.

काँग्रेसच्या बहुतेक खासदारांनी हातात संविधान घेऊन लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राहुल गांधीही त्यामध्ये मागे राहिले नाहीत. मंगळवारी दुपारी ते शपथ घेण्यासाठी निघाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. संविधानाचे नारे दिले. राहुल यांनीही अध्यक्षांजवळ गेल्यानंतर हातातील संविधान उंचावत सत्ताधाऱ्यांना दाखवले.

Rahul Gandhi took Oath
Lok Sabha Session Update : लोकसभेत दोन खासदारांची शपथ वादात; जय हिंदूराष्ट्र, जय पॅलेस्टाईनचा नारा…

राहुल यांनी हातात संविधानाची प्रत घेऊनच शपथ पूर्ण केली. त्यानंतर जय हिंद, जय संविधान असा नाराही दिला. शपथ घेतल्यानंतर ते जात असतानाच एका खासदारांनी त्यांना अध्यक्षांकडे जाण्यास सांगितले. हे लक्षात येताच ते माघारी वळले यांनी हंगामी अध्यक्षांसोबत हात मिळवले, त्यांना नमस्कार केला. पण एवढ्यावच न थांबता त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीच्या मागे उभ्या असलेल्या मार्शलशीही हात मिळवले.

शपथ घेतल्यानंतर मार्शलशी हात मिळवणारे राहुल गांधी या लोकसभेतील पहिले खासदार ठरले. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्या या कृतीचे कौतुक करण्यात आले. शपथ घेतल्यानंतर राहुल यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक देशभक्त भारतीयाचे कर्तव्य आहे. आम्ही हे कर्तव्य पूर्ण क्षमतेने पार पाडू.

Rahul Gandhi took Oath
Lok Sabha Speaker Election : ममतांचा विरोधकांना पुन्हा झटका; लोकसभेत बुधवारी होणार ‘खेला’?

दरम्यान, राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांना हातात संविधान घेऊन शपथ घेण्याचा आग्रह करताना लोकसभेत दिसत होते. मणिपूरचे खासदार शपथ घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या हातात संविधान नव्हते. ते शपथ घेण्याआधी राहुल यांनी एका खासदाराला संविधानाची प्रत त्यांना देण्यास सांगितले. त्यानंतर या खासदारांनीही हातात संविधान घेऊनच शपथ घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com