Nana Patole : 'जरांगेंचा विधानसभेचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप; राहुल गांधी PM झाले असते तर...'; पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole on Devendra Fadnavis About Maratha Reservation : सरकारने मराठा समाजाला दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला आहे.
Nana Patole and Devendra Fadnavis
Nana Patole and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 19 June : लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्याबाबत पुन्हा आक्रमक झाले आहेत. शिवाय सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला आहे. याच इशाऱ्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा लढवण्यासाठी इशारा हे फडणवीसांचं पाप आहे असं पटोले म्हणाले आहेत. शिवाय 2029 पर्यंत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकार जातीनिहाय जनगणना करणार नाहीत. त्यामुळे ते आरक्षण देऊ शकणार नाहीत. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता असंही पटोले म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. शिवाय अशातच आता राज्यभरात मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस सरकार सत्तेत आलं असतं तर आरक्षणाचा तिढा सुटला असता असा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवणार असल्याचा इशारा दिला आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, "हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे पाप आहे. 2029 पर्यंत मोदी आणि फडणवीस जातीनिहाय जनगणना करणार नाहीत, त्यामुळे हे सरकार आरक्षण देऊ शकणार नाही.

जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी आणि फडणवीस सरकारकडून होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे चुकून पंतप्रधान झाले. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता." अशा शब्दात पटोले यांनी मोदी आणि महायुती सरकारवर निशाणा साधला.

Nana Patole and Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal : शरद पवारांच्या 'या' रणनीतीने छगन भुजबळांची झाली कोंडी?

दरम्यान, पटोले यांनी काँग्रेस (Congress) कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याच्या घटनेचा निषेध म्हणून भाजपकडून चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. आता याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर चिखलफेक आंदोलन करणार असल्याचंही पटोलेंनी सांगितलं. ते म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली .

Nana Patole and Devendra Fadnavis
BJP : 'महाराष्ट्रात कुणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, तर...' दिल्लीतील नाराज वरिष्ठांचा रोख नेमका कुणाकडे?

आज भाजपने ज्या पद्धतीने आंदोलन केली त्याचं उत्तर म्हणून शुक्रवारी राज्यभरात प्रत्येक तालुक्यात भाजप कार्यालयांसमोर आणि नागपूरला देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर काँग्रेस चिखलफेक आंदोलन करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भाजप चिखलफेकीचा मुद्दा आणखी पेटण्याी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com