कुठे निघालो होते, हे पत्नीलाही सांगितले नव्हत... : शंभूराज देसाई

घरी आल्यावर सौभाग्यवतीने Wife आम्हाला सुरतची लढाई Battle of Surat जिंकुन आलात you have won असे म्हणत आमचे स्वागत केले.
Shambhuraje Desai
Shambhuraje Desaisarkarnama

मुंबई : आम्ही कुठं निघालोय हे मी पत्नीसह घरात कोणालाच सांगितलं नव्हतं. आमच्या गृहमंत्र्यांना टीव्हीवरूनच कळालं की शंभूराज देसाई नॉटरिचेबल झालेत ते. दुसऱ्या दिवशी टिव्हीवरील बातम्या पाहिल्यानंतर सौभाग्यवतींने ओळखले, हे एकनाथ शिंदे साहेबांसोबत कुठेतरी बाहेरगावी गेलेत ते, अशी आठवण, आमदार शंभूराज देसाईंनी सांगितली.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार शंभूराज देसाई यांनी मुंबई ते सुरत आणि पुन्हा गुवाहाटी आणि गोवा या प्रवासातील किस्से उघड केले. आमदार देसाई म्हणाले, आमचे हे बंड ठरवून झालेलं नव्हतं, आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आणि आम्ही बाहेर पडलो. कुठे चाललो कुठल्यादिशेने चाललोय काहीही माहिती नव्हतं. कोण एका गाडीत, कोण दुसऱ्या गाडीत असे सर्वजण निघालो होतो. महाराष्ट्र-गुजरात बॉर्डला नाकाबंदी होती, तरीही आम्ही तेथून निसटलो.

Shambhuraje Desai
तुझ्यासारखी पत्नी लाभणे...! मिसेस मुख्यमंत्र्यासाठी एकनाथ शिंदेंच स्पेशल ट्विट

आमच्याकडील बॅगेत प्रत्येकी एकच ड्रेस होता. सुरवातीला सुरतला गेलो आणि त्यानंतर गुवाहाटीला गेलो. तेथेही आम्ही सर्व आमदार हसत खेळत राहिलो होतो. एकमेकांचे किस्से सांगत चेष्टा मस्करी करत आम्ही तेथे चांगले रमलो होतो. कोणताही ताण आमच्यावर नव्हता. सुरतला जाण्यास निघण्यापूर्वी तुम्ही घरी नेमकं काय सांगितले होते, यावर आमदार देसाई म्हणाले, आम्ही कुठं निघालोय हे पत्नीसह घरात कोणालाच सांगितलं नव्हंत. आमच्या गृहमंत्र्यांना टीव्हीवरच कळाले की शंभूराज देसाई नॉट रिचेबल झालेत ते.

Shambhuraje Desai
चाळीस रेडे काय करू शकतात याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले....शंभूराज देसाई

घरी अर्जंट काही अडचण असेल तर संपर्क ठेवता येईल, म्हणून एक मोबाईल नंबर ठेवला होता. दुसऱ्या दिवशी टिव्हीवरील बातम्या पाहिल्यानंतर सौभाग्यवतींने ओळखले. दोन दिवस नॉटरिचेबल आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसोबत कुठेतरी बाहेर चाललेत. घरी आल्यावर सौभाग्यवतीने आम्हाला सुरतची लढाई जिंकुन आलात असे म्हणत आमचे स्वागत केले. पण हरून आलो असतो तर तुम्ही घरात घेतलं असता का, असाही प्रश्न आम्ही उपस्थित केला. तब्बल तीन आठवडे आम्ही घरी नव्हतो.

Shambhuraje Desai
एकनाथ शिंदे गटातील निवडक बंडखोरांसाठी आदित्य ठाकरेंचा मोठा मेसेज

माझ्या मुलीने सांगितले की, आमच्या सौभाग्यवतीने इतर चॅनेल्स बघायची बंद करून बातम्यांची चॅनेल्स बघायला सुरवात केली आहे. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. शिवसेनेचे मंत्री, आमदार आदल्यादिवशी टिव्हीवर दिसायचे आणि नॉटरिचेबल व्हायचे. दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत दिसायचे. आम्हा सर्व आमदारांना एक विश्वास होता, की आपण शिंदे साहेबांसोबत चाललो आहे. ती व्यक्ती कसलीही अडचण होऊ देणार नाही. सगळी व्यवस्था निटपणाने होत होती. कपडे वगैरे आम्ही घेतले. तसेच ज्या आमदारांना औषधे गोळ्यांची गरज होती, ती मागितली की पैसे दिले की मिळत होती.

Shambhuraje Desai
शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांची राजकीय आत्महत्या?

चार ते पाच ठिकाणे तुम्ही फिरला या सगळ्यात तुम्हाला आवडलेले ठिकाण कोणते, या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, सर्वात आवडले ते गुवाहाटी, खूप चांगले वाटले तेथील माणसं खूपच नम्र आहेत. त्यांनी आमची आदर व आपुलकीने सोय केली. आम्ही त्यांना पिठलं कसे बनवायचे ते सांगितल्यावर त्यांनी ते बनवून दिले. आम्ही सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शना गेलो होतो. ते जागृत देवस्थान आहे. मी तर शिंदे साहेबांना म्हणालो, मुख्यमंत्री झाल्यावर वहिनींना घेऊन तुम्ही परत या देवीच्या दर्शनासाठी जा. त्यावर त्यांनी मी एकटाच का, सर्व ५० आमदारांना घेऊन जाऊ, असे ते म्हणाले, इतका हा दिलदार माणूस आहे, असे त्यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com