मुंबई : महाराष्ट्रात पंधरा दिवसांच्या राजकीय सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. अनेक दिवसांनी एकनाथ शिंदे घरी आल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचे जल्लोषात स्वागतही केले. या प्रसंगी त्यांच्या पत्नी लता शिंदे या सर्वात जास्त आंनदी असल्याचे दिसले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटाला लावला आहे. मात्र या व्यक्त वेळापत्रकातही त्यांनी आज पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
"जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस, सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता, वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी लता शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्ट सोबतच त्यांनी लता शिंदे यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पहिल्यांदा घरी आले तेव्हाही लता शिंदे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्या स्वागतासाठी बोलावलेल्या वाद्यांच्या पथकात त्यांनी ड्रम वाजवतच पती एकनाथ शिंदेचे स्वागतही केले होते. लता शिंदेंनी यावेळी ड्रम वाजवत पतीचे स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
कोण आहेत मिसेस मुख्यमंत्री?
लता शिंदे या बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत. एकनाथ शिंदे यांच्या संघर्षात त्यांनी कायम मोलाची साथ दिली. वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत लता शिंदेंनी एकनाथ शिंदेंना खंबीर पाठिंबा दिला. २००० मध्ये एकनाथ शिंदेंनी एका अपघातात दोन लेकरं गमावली. पण त्या काळातही लता शिंदे हार न मानता पुन्हा नव्याने उभ्या झाल्या. आपलं कुटुंब सांभाळलं. एक रिक्षावाला ते मुख्यमंत्र्यापर्यंतच्या प्रवासात एकनाथ शिंदेंच्या खडतर आणि आव्हानात्मक प्रवासात लता शिंदेंनी त्यांना कायम साथ दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.