Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Eknath Shinde : ''हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही...''
Eknath Shinde Latest Marathi News News
Eknath Shinde Latest Marathi News NewsSarkarnama

Maharashtra : राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत ग्वाही दिली आहे.

Eknath Shinde Latest Marathi News News
Sarpanch Election : सरपंचाच्या निवडणुकीत ट्विस्ट; शिंदेगावातील दोन ग्रामपंचायत सदस्य अचानकपणे सहलीवर; कुटुंबीयाकडून अपहरणाची तक्रार

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Eknath Shinde Latest Marathi News News
Ambadas Danve News : गद्दार, पन्नास खोक्यांची होळी केल्याने दानवे-म्हस्केंमध्ये जुंपली..

मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली असून महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com