Students Protest : हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, थेट अभिजीत दिपकेंचा व्हिडिओ काॅल

High Court Clerk Exam Abhijit Dipke : कल्याणमध्ये हायकोर्टाच्या लिपीक टंकलेखक पदासाठी झालेल्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला. ज्या परीक्षे केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तेथे कोणत्याही सुविधा नव्हत्या.
Students stage a protest in Kalyan over alleged confusion during the High Court clerk examination.
Students stage a protest in Kalyan over alleged confusion during the High Court clerk examination.sarkarnama
Published on
Updated on

kalyan News : कल्याणमधील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावरील अनागोंदी कारभारचा फटका परिक्षार्थी उमेदवारांना बसला. हायकोर्टाच्या लिपिक भरतीसाठी या केंद्रावर रविवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र, अनागोंदी कारभारचा फटका परिक्षार्थी उमेदवारांना बसल्याने २५०हून अधिक परिक्षार्थीसह पालकांनी संतप्त होत ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवित परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिक्षा केंद्राच्या ढिसाळ कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.

परिक्षेसाठी आसन व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार देखील विद्यार्थ्यांनी केली. अनेक संगणक धुळखात पडलेले होते, तर काही संगणक सुरूच होत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्धा तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचं समोर आलं आहे.

Students stage a protest in Kalyan over alleged confusion during the High Court clerk examination.
High Court Clerk Exam : सर्व्हर डाऊन, अंधार अन् की-बोर्ड बंद; परीक्षार्थी संतापले, पोलिसांना पाचारण

संगणक सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट रखडली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार अडकले असतानाच सव्वा बारा आणि 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने गर्दी वाढली. जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले. पालकांनीही व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत , परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला. दरम्यान, संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया उशिराने होत असल्याचे सांगत समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याची सांगितले होते. या सर्व गोंधळाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये देखील संतापाचं वातावरण पहायला मिळाले. पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

अभिजीत दिपकेंना व्हिडिओ कॉल

हायकोर्टाचा क्लर्क साठी टायपिंग स्किल टेस्ट परीक्षा दरम्यान तांत्रिक विभागामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागले. संगणक आणि कीबोर्ड मध्ये तांत्रिक विभाग एवढेच नाही तर परीक्षार्थी यांना बसण्यासाठी आसन व्यवस्थेवर परीक्षार्थी प्रचंड नाराज झाले. यादरम्यान परीक्षार्थी प्रचंड गोंधळ घातलाएवढेच नाहीतर परीक्षार्थी जे पहिल्या सत्रात गेले होते, त्यांना बाहेर जाऊ देत नसल्यामुळे दुसरा सत्राच्या परीक्षार्थी गोंधळ घातला यादरम्यान परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणांनी अभिजीत दिपके व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधला आहे.

Students stage a protest in Kalyan over alleged confusion during the High Court clerk examination.
High Court exam controversy : सरकारचे पुन्हा टेन्शन वाढले! अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; हायकोर्ट लिपीक पदाच्या परीक्षेवरून विद्यार्थी उतरले रस्त्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com