Kishori Pedanekar
Kishori PedanekarSarkarnama

Kishori Pedanekar News: SRA प्रकरणी किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा

SRA Scam: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
Published on

SRA Scam News Update: शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एसआरए सदनिका प्रकरणात पेडणेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ३० मार्च पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. पेडणेकरांविरोधात ३० मार्च पर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकरांनी त्यांच्या कुटुंबियांनी एसआरए प्रकल्पातील काही फ्लॅट आणि दुकानाचे गाळे परस्पर आपल्या नावावर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांप्रकरणी या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून त्यांची चौकशी सुरु होती.

Kishori Pedanekar
Shiv Sena News : उद्धव ठाकरेंना धक्का : SRA घोटाळ्याप्रकरणी मोठ्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईच्या माजी महापौर, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए (Worli Gomata SRA) प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक करण्यात आली. पालिका कर्मचाऱ्याचा सुद्धा यात समावेश आहे. हे तीन्ही आरोपी आता पोलिस कोठडीमध्ये आहेत. एसआरए प्रकल्पातील काही गाळे परस्पर लांबवले, असा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचबोबर यामध्ये संजय लोखंडे या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. लोखंडे सोबत पेडणेकरांचे व्हॉट्स अॅप चॅट आढळून आल्याप्रकऱणी पेडणेकरांची चौकशी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com