Loksabha Election 2024 : वसई-विरार, डहाणू, पालघर व विक्रमगड या भागातील ठेकेदारांकडून भाजपने 20-20 कोटी रुपये जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी वसई-विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांची एका विशेष जागी बैठक घेऊन त्यांना हे पैसे जमा करून देण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीला बेडकाची उपमा देत त्यांना आम्ही वसई-विरारमध्येच निपटवू, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला जशास तसे उत्तर मंगळवार, 15 मे रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथील पत्रकार परिषदेतून दिले. त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही खळबळजनक माहिती जनतेसमोर आणली.
२०-२० कोटी इतके पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर, अशी कोणती कामे या भागात सुरू आहेत? असा प्रतिप्रश्नही आमदार हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur) यांनी यानिमित्ताने केला आहे. कामे करा, अथवा नका करू, तुमची बिले निघतील, असे सांगून प्रत्येक ठेकेरादाकडून 20 कोटी रुपये घेतले जात असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गरज वाटल्यास फन हॉटेलची मागील 15 दिवसांची सीसीटीव्ही फुटेजेस तपासा. कोण आले, कोण गेले हे आपल्या लक्षात येईल. कदाचित ही फुटेजेस उडवलीही गेली असतील. पण काल मला वसई-विरार महापालिकेतील एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांना 20 कोटी जमा करून देण्यास सांगण्यात आले असल्याचे हा अधिकारी म्हणाला, अशी माहिती ठाकूर यांनी देऊन एकच खळबळ उडवून दिली. तेव्हा आम्हाला निपटून टाकण्याची भाषा करू नका. त्याऐवजी तुमच्या पालकमंत्र्यांना आवरा. नाहीतर आम्हीच तुम्हाला निपटवून टाकू, असा सज्जड दम आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना दिला आहे.
भाजप(BJP) जिल्ह्यात दबावाचे राजकारण करत आहे. एका महिला गटविकास अधिकाऱ्याने कमळ हे चिन्ह नाही लावले, तर यांनी तिच्या निलंबनाचे आदेश काढले. अशाच प्रकारे यांनी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, वसई-विरार महापालिका आणि अन्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या प्रचाराला जुंपले आहे, अशा संतप्त शब्दांत ठाकूर यांनी भाजपविरोधातला आपला राग व्यक्त केला.
दरम्यान; वसई-विरारमध्ये निपटून टाकू. हा काय गाजर-मुळा आहे का? शेर की खाल पेहनके... अशी भाषा त्यांनी केली. अरे इथे शेरच आहेत. खरं तर वसईमध्ये निपटून टाकू म्हणणे हा समस्त वसई-विरारकरांचा अपमान आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधत; हिंमत असेल तर इज्जतीत लढा, असे आव्हान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
या नियमांच्या अंमलबजावणीनंतर, 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे किंवा त्यांच्या भीतीमुळे भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.