Devendra Fadnavis Vs Sanjay Raut : पोपटलाल म्हणतात, 5 वर्षात 5 पंतप्रधान देऊ, फडणवीसांची राऊतांना फटकारलं

Maharashtra Lok Sabha Election Political News : राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा आहे..
Sanjay Raut - Devendra Fadnavis
Sanjay Raut - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराला आता अधिक वेग आला आहे. महाराष्ट्रातील 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभेसाठी महायुतीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकेची झोड उठविली.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा ध्यास महायुतीने घेतला असून मोदी यांच्या नेतृत्वात दक्षिण मुंबईचा महायुतीचा उमेदवार संसदेत पाठविण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. यामिनी जाधव यांच्या सारखी रणरागिणी उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. गेले पाच वर्षे बघतोय त्यांच्याकडे लढण्याची, विचार करण्याची ताकद आहे, त्या अभ्यासू आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांचे कौतुक केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Ajit Pawar News : मुंबईत महायुतीचं 'शक्ती'प्रदर्शन, मोदींचा 'रोड शो'; पण अजितदादांची दांडी; 'हे' कारण आलं समोर

ही निवडणूक छोटी नाहीये. देशाचा नेता आपल्याला सर्वांना निवडायचा आहे. या लोकसभेच्या लढाईत एकीकडे पांडवांचं सैन्य आहे, दुसरीकडे कौरवांचं सैन्य आहे. पण इकडे पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी महायुतीसोबत आहेत. तिकडे राहुल गांधी आहेत आणि त्यांच्या सोबत 24 पक्षांची खिचडी आहे. आमचं ठरलं आहे. आमचं सरकार येणार आणि मोदीजी हेच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. पण जर चुकून महाविकास आघाडीचे सरकार आलं तर कोणाला पंतप्रधान करणार, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

दररोज सकाळी नऊ वाजता टीव्हीवर पोपटलाल येतात. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला महाविकास आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार तर ते सांगतात आम्ही 5 वर्षे पाच पंतप्रधान देऊ, ते संगीत खुर्ची खेळणार. एक खुर्ची मध्ये ठेवणार आणि 24 पक्षांचे नेते खुर्चीभोवती फिरणार. जो पहिला खुर्चीवर बसणार तो पहिला पंतप्रधान, दुसरा बसणार तो दुसरा, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडविली. विरोधी पक्षाचा नेता ते निवडू शकत नाहीत, तुम्ही पंतप्रधान काय निवडणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
PM Modi Kalyan Sabha: मोदींच्या सभेपूर्वी रंगले 'मानापमान'; सन्मान नाही, मग पद कशाला? ; जिल्हाप्रमुखाने घेतला मोठा निर्णय

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांना जागा आहे. लालूच्या पोराच्या इंजिनमध्ये फक्त त्याचं कुटुंब आहे. महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या पक्षांच्या इंजिनमध्ये त्यांच कुटूंबातील सदस्य आहे. पण त्यांच्यामध्ये जनता नाहीये. देशाचे नुकसान करणारी ही महाविकास आघाडी असून तिचा परावभ करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal News: भुजबळ यांनी भाजपला सुनावले, म्हणाले, कांद्याचा किमान खर्च द्यावा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com