Ghatkopar Hoarding Collapses : घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना,होर्डिंग कोसळलं! 3 जणांचा मृत्यू, 62 जखमी; CM शिंदेंचा मोठा निर्णय

Mumbai Rains : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच होर्डिंगखाली अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.
Hoarding Collapses In Ghatkopar
Hoarding Collapses In GhatkoparSarkarnama

Mumbai News : मुंबईत वादळी वाऱ्यामुळे दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ आणि नंतर घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळले. या दोन्ही घटनांमुळे प्रचंड धावपळ उडाली. सोमवारी दुपारी धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली.

त्यात सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली.या ठिकाणी पेट्रोलपंपावर अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळले.यात तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Hoarding Collapses In Ghatkopar
Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच होर्डिंगखाली अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.घटनेचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाचारण करण्यात आलं आहे.आता या घटनेनंतर मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.याचदरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून 5 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील होर्डिग कोसळण्याच्या घटनास्थळी धाव घेतली. यानंतर प्रशासनाला यंत्रणांना तत्काळ मदतीचे निर्देश देतानाच मोठा निर्णय घेतला. ही घटना दुर्दैवी असून घटनास्थळी तातडीने मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संबंधित घटनेतील दोषींंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 35 जणांवर उपचार सुरु आहेत.त्यावर होर्डिंग उचलण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून रेस्क्यू करणं आणि लोकांना बाहेर काढणं याला प्राधान्य आहे,अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.याचवेळी मुंबईतील लावण्यात येणार्‍या होर्डिंगचे ऑडिट करण्यात येणार असून अशाप्रकारे अनधिकृत होर्डिंग असतील तर त्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, आतापर्यंत या दुर्घटनेत आत्तापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून,अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून,त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com