Raj Thackeray In Pune : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; वसंत मोरेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार?

Vasant More News : पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरावरून मनसे आक्रमक
Raj Thackeray In Pune : Vasant More News
Raj Thackeray In Pune : Vasant More NewsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नुकताचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या सभेतून त्यांनी राजकारणातल्या विविध मुद्द्यावर जोरदार भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. तसेच राज्यातील विविध मुद्द्यावर ही भाष्य केले. गुढीपाडवा मेळ्यावानंतर आता राज ठाकरेंचा पुणे दौरा होत आहे.

Raj Thackeray In Pune : Vasant More News
Ravi Shankar Prasad : देशात प्रत्येकासाठी एकच कायदा मग तुमच्यासाठी...; राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

राज ठाकरे यांचा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा पुणे दौरा होत आहे. राज ठाकरेंचा हा खासगी दौरा असला तरी, उद्या पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबई येथील माहीमजवळच्या समुद्रात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मजारवर प्रशासनाने कारवाई केली. आता यानंतर पुणे शहरात पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray In Pune : Vasant More News
Bacchu Kadu News: बच्चू कडूंची आमदारकी रद्द होण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; पण हा कायदेशीर मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

याबाबतीत पुणे शहर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यानंतर राज ठाकरे हे मनसेचे प्रसिद्ध नेते व माजी नगरसेवकवसंत मोरेंच्या डॉग पाँड उद्घाटन कार्यक्रमाला लावणार हजेरी आहेत. मागील आठवड्यात राज ठाकरेंनी वसंत मोरेंना 26 तारखेची वेळ दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com