Election Commission : मतांची टक्केवारी कशी वाढली, EVM मध्ये घोळ? विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

Increase in voter turnout in Maharashtra : निवडणुकीच्या निकालाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी EVM विरोधात मोठं जन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे. आघाडीतील घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने देखील विधानसभा निकालावर संशय व्यक्त केला आहे.
S Chokkalingam Election commission
S Chokkalingam Election commissionSarkarnama
Published on
Updated on

Increase in voter turnout in Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला आहे. मात्र, पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपल्या पराभवाचं खापर 'ईव्हीएम'वर फोडल्याचं पाहायला मिळत आहे. (Maharashtra Assembly Elections Result)

दरम्यान, विधानसभेच्या निकालाविरोधात कोर्टात जाण्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी EVM विरोधात मोठं जन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा केली आहे. आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह (शरद पवार) वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने देखील विधानसभा निकालावर संशय व्यक्त केला आहे.

यातील बहुतांश नेत्यांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते. मग ही टक्केवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 वर कशी पोहोचली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली नसल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. अखेर याच सर्व आरोपांवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

S Chokkalingam Election commission
Mahayuti Politics : मुख्यमंत्रिपदाचा त्याग पण 'या' खात्यांबाबत 'नो कॉम्प्रोमाइज'; CM शिंदेंची अमित शहांकडे मोठी मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chokkalingam) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटमध्ये एस. चोक्कलिंगम यांनी लिहिलं की, संध्याकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणं हे नॉर्मल आहे. कारण निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदानासाठी मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. त्यामुळे हा टक्का वाढतो.

S Chokkalingam Election commission
Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्री ठरला? भाजपचा शिंदेंच्या खात्यांवर डोळा, अजितदादांच्या वाट्याला काय?

तर शेवटच्या तासात जवळपास 7.8 टक्के मतदान वाढले आहे. यावर त्यांनी सांगितलं की, "संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी जो मतदार (Voter) रांगेत उभा असतो तो आपला मतदानाचा हक्क बजावेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच असते. तर यावेळी त्यांनी 2019 साली 5 वाजता 54.4 टक्के मतदान झाले होते.

मात्र अंतिम मतदानाची (Voting) आकडेवारी 61.1 झाली होती अशी माहिती सांगितली. तसंच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही फोनवरून तोंडी दिली जाते. मात्र, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म 17-सी भरून देतात, ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com