Hrishikesh Vaidya: आणखी एक अशोक खरात सापडला! महादेवाचा अवतार असल्याचं सांगून केला महिलेवर बलात्कार

Hrishikesh Vaidya: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणं चांगलंच चर्चेत आहे. त्यातच आता आणखी एक अशोक खरात समोर आला आहे. हा देखील एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु असून तो वसईचा रहिवासी आहे.
crime News
crime NewsSarkarnama
Published on
Updated on

विरार : राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणं चांगलंच चर्चेत आहे. त्यातच आता आणखी एक अशोक खरात समोर आला आहे. हा देखील एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु असून तो वसईचा रहिवासी आहे. आपण भगवान शंकराचा अवतार असल्याचं सांगून त्यानं एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित महिलेनेच याप्रकरणी पोलिसांत धाव घेतल्यानं या व्यक्तीचा भांडाफोड झाला आहे.

crime News
Sangali Crime: शुल्लक कारणावरून बापानं पोटच्या लेकींना दोन रात्री खुंट्टीला टांगलं! एकीचा मृत्यू, दुसरी...; सांगलीतील धक्कादायक घटना

ऋषीकेश वैद्य असं या बलात्कारी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुचं नाव असून त्याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठोण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही पुण्याची असल्यानं हे प्रकरण आता हडपसर पोलिसांत वर्ग करण्यात आलं आहे. पीडित महिला ३५ वर्षांची असून तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये तिची फेसबुकवरुन वसईतील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि 'आमची वसई' या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य (वय ४०) याच्याशी ओळख झाली. त्याने पीडित महिलेच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली.

crime News
Ashok Kharat Case: खरातची आता खैर नाही! ज्यानं धाडसानं हे प्रकरण समोर आणलं त्या पत्रकाराकडून उद्या...; घेतला मोठा निर्णय

दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटायाल पुण्यात गेला. "मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस" असं सांगून तिला भुलवलं. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. यावेळी वैद्य यानं तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रं काढली. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावलं. मे २०२५ मध्ये वसईतील एका हॉटेलात तिला भेटायला बोलावून पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न केला.

crime News
8 व्या वेतन आयोगाची टाईमलाईन ठरली; किती पगारवाढ अन् थकबाकी मिळणार?

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात या भोंदूबाबाचं लैंगिक शोषणाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर वसईतल्या या पीडित महिलेनं देखील हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com