Ashok Kharat Case: खरातची आता खैर नाही! ज्यानं धाडसानं हे प्रकरण समोर आणलं त्या पत्रकाराकडून उद्या...; घेतला मोठा निर्णय

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर आत्तापर्यंत सुमारे १० गुन्हे दाखल झाले आहेत.
Dattatray Khemnar_Ashok Kharat
Dattatray Khemnar_Ashok Kharat
Published on
Updated on

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर आत्तापर्यंत सुमारे १० गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर आता उद्या त्याच्यावर आणखी एक कादयदेशीर कारवाईची नोंद केली जाणार आहे. यासाठी अहिल्यानगरमधील ज्या स्थानिक पत्रकारानं हे प्रकरण धाडसानं पुढे आणलं त्या पत्रकारानं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Dattatray Khemnar_Ashok Kharat
8 व्या वेतन आयोगाची टाईमलाईन ठरली; किती पगारवाढ अन् थकबाकी मिळणार?

अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांबाबत पहिल्यांदा दै. खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी सर्वात आधी आपल्या वर्तमानपत्रात बातमी छापली होती. या बातमीत अशोक खरातचं नाव नव्हतं पण त्याच्या उद्योगांचा लेखाजोखा होता, यामुळं संतापलेल्या खरातनं स्वतः वावी पोलीस ठाण्यात जाऊन संपादक खेमनर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर खेमनर यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही या अशोक खरातकडून करण्यात आला. दोन वेळेला त्यांच्यावर ह्ल्ल्याचा प्रयत्नही झाला, अशी माहिती खुद्द दत्तात्रय खेमनर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

Dattatray Khemnar_Ashok Kharat
IAS : विधासभा निवडणूक लढवता येईना; सरकारकडून छळ! IAS अधिकाऱ्याचे मोदी सरकारवर गंभीर आरोप

खेमनर यांनी यावेळी इतरही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आधी आपल्या पीएकरवी खेमनर यांना माफीनामा छापण्यासाठी दबाव आणला. पण खेमनर यांनी हा दबाव धुडकावून लावल्यानंतर खुद्द चाकणकर यांनीच खेमनर यांना फोन करुन अशोक खरातविरोधात मोघम बातमी कशी काय लावली? असा सवाल केला. तसंच खरात हा चांगला बाबा आहे असा खुलासा छापण्यास सांगितलं. पण तरीही खेमनर यांनी असा खुलासा न छापल्यानंतर अखेर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या लेटरहेडवर खेमनर यांना पत्र लिहून तुमच्याकडं कुठलाही पुरावा नसताना बातमी छापली तर याचा दोन दिवसांत आयोगाच्या ई-मेल आयडीवर उत्तर देण्यास सांगितलं.

Dattatray Khemnar_Ashok Kharat
Farmer's Income: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ८ टक्के वाढ! मोदी सरकारचा मोठा दावा; पण वास्तव काय?

त्याला दत्तात्रय खेमनर यांनी उत्तर देताना राज्य महिला आयोगाकडं विशेष शक्ती आणि स्वतंत्र पोलीस यंत्रणा असल्यानं नाशिक-सिन्नर परिसरात भोंदूबाबाचा सुळसुळाट झालेला आहे, याची पाळमुळं खणून काढण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र केवळ खेमनर यांच्या वृत्तपत्रात अशोक खरातविरोधात बातमी छापून आल्यामुळं काही पीडित महिलांनी आपल्यावर खरातनं केलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळालं आणि या प्रकरणातला पहिला गुन्हा खरातवर दाखल झाला असा या प्रकरणातला संपूर्ण तपशील खेमनर यांनी सांगितला आहे.

Dattatray Khemnar_Ashok Kharat
Nilesh Rane politics : तळकोकणात सभापती निवडीत राणेंचे धक्कातंत्र! जुन्या-नव्या सदस्यांचा संगम करण्यात महायुतीला यश

खरातवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत FIR करणार

संपादक दत्तात्रय खेमनर यांनी सांगितलं की, मी अशोक खरातच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकासमोर गेलो त्यांना माझ्याकडं असलेले संपूर्ण पुरावे दिले आहेत. यानंतर आता उद्या कॅप्टन खरात याच्यावर उद्या गुन्हा दाखल करणार आहे. महाराष्ट्रात पत्रकारांसाठी जो संरक्षण कायदा आहे या कायद्यांतर्गत मी उद्या (दि. २७ मार्च) कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. त्याचबरोबर खरातवर आणखी काही गंभीर स्वरुपाची कलम लावता येतील का? यासाठी आज रात्री आणि उद्या सकाळी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन खरातवर गुन्हा दाखल करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com