"मी मोठा की तू मोठा गद्दार, जणू स्पर्धाच लागली.."

Kishori Pedanekar : पूर्ण सहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी भोगली.
Kishori Pedananekar
Kishori PedananekarSarkarnama

मुंबई : अंधेरीपूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. सत्तापालट झाल्यानंतरची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) तर ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Kishori Pedananekar
RSS : ‘भारत जोडो’मुळे डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम समाजासोबत बोलावे लागले !

पेडणेकर यांनी आक्रमक होत, पावसकरांचा खरपूस समाचार घेतला. पेडणेकर म्हणाल्या की, हरीश वरळीकर या व्यक्तिने किरण पावसकरांच्या यांच्या थोबाडीत वाजवली होती. पावसकरांनी सहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी भोगली. आता यांच्यातच स्पर्धा लागली आहे की, मी मोठा गद्दार की तू मोठा गद्दार हे सांगण्याची. मात्र यात किरण पावसकरचा पहिला नंबर लागला, अशा शब्दात पेडणेकरांनी पावसकरांवर घणाघात केला.

Kishori Pedananekar
मोठी बातमी : आशिष शेलार यांना राष्ट्रीय स्तरावर संधी; जय शहांचा पुढाकार

दरम्यान, न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला. राजीनामा मंजूरीचे पत्र हाती येताच ऋतुजा लटके शिवसेनेच्या बाजूने अंधेरीपूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपच्या बाजून मुरजी पटेलांनी उमेदवारी अर्ज भरला. आता शिवसेनेकडून ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल असा दुरंगी सामना पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com