Maharashtra Politic's : अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेत्याचे मिश्किल विधान; म्हणाले ‘मी राज्याचा मुख्यमंत्रिसुद्धा होऊ शकतो...’

Narhari Zirwal Statement : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडे हिंगोलीचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी पहिल्याच हिंगोली दौऱ्यात वादग्रस्त विधान केले होते, त्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली होती.
Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 10 April : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पुन्हा एकदा मिश्किल विधान केले आहे. मी राज्याचा मुख्यमंत्रिसुद्धा होऊ शकतो, असे झिरवाळ यांनी पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना हे विधान केले आहे, त्यामुळे झिरवाळ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता शिबिर झाले. त्या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) बोलत होते. त्या वेळी त्यांनी मी मुख्यमंत्रिसुद्धा होऊ शकतो, असे विधान केले.

मी राज्याचा मुख्यमंत्रिसुद्धा (Chief Minister) होऊ शकतो. कारण मी 288 आमदारांचे सभागृह पाच वर्षे चालवलं, असे मिश्किल विधान झिरवाळ यांनी केले आहे, त्यामुळे मिश्किल स्वभावाचे झिरवाळ पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाळ यांनी असंच मिश्किल विधान केले होते. मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी त्यांनी जाहीरपणे केली होती.

Narhari Zirwal
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या पदाधिकाऱ्याविरोधात शिवसेना आक्रमक; ‘पोलिसांत तक्रार, ...हा तर भाजप, मिंधे गटाचा डाव’

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे हिंगोलीचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी पहिल्याच हिंगोली दौऱ्यात वादग्रस्त विधान केले होते, त्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली होती.

हिंंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्रीपद माझ्यासारख्या आदिवासी समाजातून आलेल्या गरीब माणसाकडे दिले आहे, असे विधान झिरवाळ यांनी पहिल्याच हिंगोली दौऱ्यात केले होते. त्यावर त्यांना तातडीने खुलासा करावा लागला होता. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याची दखल घेतली हेाती. त्यांनी असे विधान का केले, याबबात मी त्यांच्याकडे विचारणा करेन, असे अजितदादांनी सांगितले होते.

Narhari Zirwal
Eknath Shinde's Big Announcement : एकनाथ शिंदेंची सांगोल्यासाठी मोठी घोषणा; ‘तुम्ही मला जागा द्या; उद्योगमंत्र्यांना सांगून तुम्हाला....’

माणिकराव कोकाटेंचे आक्षेपार्ह विधान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशातून तुम्ही काय करता. कर्जमाफीच्या पैशातून तुम्ही साखरपुडा, लग्नं करता, असे विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. त्याबाबत त्यांना अजित पवार यांनी तंबी दिली होती. तो वाद शांत होतो न होतो तोच आज नरहरी झिरवाळ यांनी मिश्किलपणे नवे विधान केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com