`ती महिला पोलिस तेथे काय करत होती? तिला माझा स्पर्शही झालेला नाही..`

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा गुन्हा
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

प्रभादेवी : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला जखमी करणे, जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक कारवाईचे उल्लंघन आदी प्रकारांबद्दल आज गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या तावडीतून निसटून जाताना झालेल्या झटापटीत एक महिला पोलिस जखमी झाली होती. त्यामुळे दोघांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Mumbai Police files FIR against Sandeep Deshpande, MNS leader)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देत गाडीत बसून जाण्यात यशस्वी झाले. दरम्‍या,न झटापटीत एक महिला पोलिस खाली पडून जखमी झाली. त्याची गंभीर दखल घेत देशपांडे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दिवसभर पोलिस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेत होते.

Sandeep Deshpande
सध्याची प्रभागरचनाच कायम : जुलैमध्ये उडणार पालिका, ZP निवडणुकांचा बार

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. भोंग्यांसंदर्भातील माहिती देण्याकरिता संदीप देशपांडे व संतोष धुरी ‘शिवतीर्था’वर गेले होते. राज ठाकरे यांना भेटून बाहेर आल्यानंतर माध्यमाशी प्रतिक्रिया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु माध्यमाच्या गर्दीचा फायदा घेत ते गाडीत बसून निघून गेले. दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही सह्यांची मोहीम राबवून आंदोलन सुरू ठेवू,असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Sandeep Deshpande
जेव्हा राज ठाकरे यांना मध्यरात्री २.४५ मिनीटांनी अटक करण्यात आली होती...

महिला पोलिसाला राज ठाकरेंचे निमंत्रण
संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना एक महिला पोलिस कर्मचारी जमिनीवर पडून जखमी झाली. त्याची दृष्ये समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संदीप देशपांडे यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याची दखल घेत राज ठाकरे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याला भेटीचे निमंत्रण दिले.

मी निर्दोष : संदीप देशपांडे
संबंधित महिला पोलिसाला आमचा स्पर्शही झाला नाही. मला पकडण्यासाठी पुरुष अधिकारी उपस्थित असताना ती तिथे काय करत होती, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. देशपांडे यांनी एका व्हिडीओद्वारे आपली बाजू मांडली. देशपांडे यांचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. मी पळून गेलो नाही. सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात. सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य बाहेर येईल, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com