Mohit Kamboj News : ''आघाडी सरकारनं माझ्यासोबत काय काय केलंय हे मी विसरलेलो नाही...''

Maharashtra Politics: मला त्रास देण्यासाठी ५७ नोटीस दिल्या...
Mohit Kamboj|
Mohit Kamboj| Sarkarnama

Mohit Kamboj on MVA Government : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक दावा केला होता. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडीतील नेतेंमडंळींनी फडणवीसांचा दावा खोडून काढला तर भाजपकडून समर्थन करण्यात येत आहे. याचदरम्यान आता भाजप नेते मोहित कंबोज यांचं टि्वट करत महाविकास आघाडीवर लक्ष्य केलं आहे.

मोहित कंबोज यांनी टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या सूडाच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे. कंबोज यांनी पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीत वाद पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारनं माझ्यासोबत काय काय केलंय हे मी विसरलो नाही. माझ्यावर जमावानं प्राणघातक हल्ला करत माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला.या काळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप केला आहे.

Mohit Kamboj|
MVA News : महाविकास आघाडीत आंबेडकरांवरुन वादाची ठिणगी? राऊत- पटोलेंच्या वक्तव्यानं संशयांचं धुकं वाढलं

तसेच माझं घर आणि ॲाफिस पाडण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या. मला त्रास देण्यासाठी ५७ नोटीस दिल्या. मला आणि माझ्या कुटुंबियांना दिवसरात्र जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मी यातलं काहीही विसरलो नाही. अशा आशयाचं टि्वट केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.

Mohit Kamboj|
Nashik Graduate constituency: पदवीधरमध्ये नवा ट्विस्ट; नाशिकमध्ये शुभांगी पाटलांना वंचितचे आव्हान..

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट...

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आणि मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. एवढंच नाही तर यासाठी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पण कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा आणि तुरुंगात टाका, असे आदेश ठाकरे सरकारचे होते. हेदेखील सत्य आहे. पोलीस प्रशासनातील कोणालाही विचारलं, तर तेदेखील हेच सांगतील असंही ते म्हणाले होते.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचे आरोपांचं खंडन करताना देवेंद्रजी,आपसे ये उम्मीद न थी, अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा राज्यातील,पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर राज्याचे गृहमंत्री म्हणून बोलणं अपेक्षित आहे. तसेच फडणवीसांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला पाहिजे असा टोलाही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com