Tukaram Munde News : 20 लाखांचे फर्निचर,75 हजारांचा शाॅवर; IAS तुकाराम मुंढेंचे 65 लाखांचे बीलं एका रात्रीत क्लिअर?

Tukaram Munde Flat Renovation PWD : तुकाराम मुंडे यांनी यांनी प्लॅटच्या रिनोवेशनसाी तब्बल 65 ते 70 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Tukaram Munde
Tukaram Mundesarkarnama
Published on
Updated on

Tukaram Munde News : IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून परिचित आहेत. सध्या ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. मलबार हिलमध्ये ज्या शासकीय निवासस्थानमध्ये ते राहतात. त्यासाठी रिनोवेशन (Renovation) करण्यासाठी तब्बल 65 ते 70 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा विषयीचे वृत्त 'इंडिया टुडे'च्या मराठी युट्यूब चॅनलने दिले आहे.

मुंढे मलबार हिल येथील सरकारच्या अंवती या बिल्डिंगमधील प्लॅटमध्ये राहण्यासाठी आहेत. तेथे येथे शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचे रिनोवेशन केले. त्यासाठी तब्बल 65 ते 70 लाख रुपये खर्च झाला. या खर्चाचे बील त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आणि बांधकाम विभागाने देखील ते एका रात्रीत मंजुर केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

फ्लॅटचे रिनोवेशन करताना 70 हजाराचा शाॅवर बसल्याचा तसेच 20 लाखांचे फर्निचर केल्याच्या पावत्या बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच किचनमध्ये बदल तसेच प्लास्टर करण्यासाठी, फर्शी बदलण्यासाठी देखील खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली होत असते ते एका जागी फार काळ राहत नाहीत त्यामुळे त्यांनी येवढा खर्च करणे आणि तो बांधकाम विभागाने मंजूर करणे योग्य नसल्याची टीका करण्यात येत आहे.

Tukaram Munde
Tanaji Sawant: पुराच्या पाण्यात फॉर्च्युनर बुडाल्यानंतर तानाजी सावंतांच्या नव्या कोऱ्या डिफेंडरचा Video Viral; टीकेचा भडीमार सुरु

साडेनऊ कोटी खर्च

ज्या अवंती इमरातीमध्ये तुकाराम मुंढे हे सध्या राहत आहेत. त्या इमरातीच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार वर्षापूर्वी साडेआठ ते साडेनऊ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मलबार हिल या भागात असलेल्या या इमारतीमध्ये जवळ मंत्र्यांचे बंगले देखील आहेत.

Tukaram Munde
Election Commission: खळबळजनक! मतदारयादीतून 20 गावं गायब ? निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा वादात,विरोधकांच्या संशयाला बळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com