MLA Disqualification Case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) निकाल दिला. त्यात शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर (विदीन रिजनेबल टाईम' Within Reasonable Time) निर्णय देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत.
निकालात शिवसेना (Shivsena) पक्षफुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेस संरक्षण मिळण्याची सूट या प्रकरणात नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कोणता आहे, हे ठरवून त्यावर आधारीत अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घेताना दहाव्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ घ्यावा, असेही न्यायालयाने निकाल देताना सूचविले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो, असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
निकालानंतर शुक्रवारी (ता. १२) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अनिल परब म्हणाले, "हा निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना जास्त वेळ लागणार नाही. कारण याचिकेत फ्लोअरवर पक्षांविरोधात केलेले काम तपासण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या यंत्रणेची गरज नाही. पुरावे, साक्षीदारांची गरज नाही. हे काम कॅमेऱ्यासमोर झालेले आहे. त्यात सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. त्यात किती लोकांनी पक्षविरोधात काम केल्याचे समजेल. याबाबत निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा, यासाठी त्यांना पत्र देणार आहे."
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (ता. १२) एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिपचा आदेश न मानणाऱ्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईममध्ये निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले की, "लवकरात लवकर ही काही कालमर्यादा नाही." त्यामुळे या प्रकरणी निर्णय नक्की कधी होणार? असा प्रश्न ठाकरे गटापुढे निर्माण झाला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.