Thackeray-BJP Politics: राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणावर दावा केला. निवडणूक आयोगानेही शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भाजपने आता दैनिक सामना वृत्तपत्र बंद करण्याचा इशारा दिला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सामना वृत्तपत्र बंद करण्यासाठी प्रेस कौन्सिकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. या मुळे हे राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Shivsena to Close Thackeray's 'Saamana' after party symbol: direct warning from Union Minister)
ठाण्यात मंगळवारी (४ एप्रिल) ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरुन त्यांच्यावर टिकाही केली. यावरुन आता राजकारण तापलं आहे. कालच्या घटनेनंतर आज नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर हल्लाबोल केला. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेले दैनिक सामना वृत्तपत्र बंद करण्याचा इशाराही दिला.
''मी आज एक वृत्तपत्र मागवून घेतलं त्याचं नाव आहे दैनिक सामना. मी याला वृत्तपत्र असं म्हणणार नाही. यात जनहिताचं, देश हिताचं, महाराष्ट्र हिताचं काय आहे? सर्वसामान्य जनतेला आवडेल रुचेल अशी ही भाषा आहे का, असे प्रश्न राणेंनी उपस्थित केले. तसेच, राज्याच्या मुख्यंमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी असं वृत्तपत्र राज्यात सुरु राहावं का, याचा विचार करावा असं मला वाटतं. तसेच. दैनिक सामना बंद करण्यासाठी आपण प्रेस कौन्सिलकडे कोणी या विरुद्ध तक्रार केली नाही, तर मी करणार आणि या वृत्तपत्राविरोधात आपण कोर्टात जाणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले, काल ठाण्यात एक घटना घडली. त्यानंतर लगेच ब्रेकिंग न्युज सुरु झाल्या पण खरंच तिथे असं काही भयानक घडलं होतं का, त्या महिलेले मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. पण माझ्याकडे तिचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. त्यात संबंधित महिलेला कोणत्याही गंभीर स्वरुपाची मारहाण झाल्याचं दिसत नाही.
दरम्यान, राज्यात जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेनेची ओळख असलेल्या दैनिक सामनातून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टिका केली जाते. या टिकांवरुन अनेकदा भाजप- शिंदे गटात वादाच्या ठिणग्या पडत असतात. आरोप-प्रत्यारोप होत असतात. सामना वृत्तपत्रात अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील आणि देशभरातील भाजप सरकारावर टिका केली जाते.या वरुन आता राणे यांनी थेट वृत्तपत्र बंद करण्याचा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.