Palghar News : चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; पालघर भरारी पथकाची कारवाई

Illicit Liquor Transport Ambulance : दादरा आणि नगर हवेलीमधून आणलेली बेकायदा दारू मनोर वाडा खडकोणे येथे पकडली
Illicit Liquor Palghar
Illicit Liquor PalgharSarkarnama
Published on
Updated on

गुन्हेगारांची डोकी कशी चालतील याचा भरवसा नाही. याची प्रचिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला काल (14 डिसेंबर) आली. त्यांनी चक्क दारूची वाहतूक करणारी अॅम्ब्युलन्स पकडली आणि यातून तब्बल 10 लाखांची दारू जप्त केली. विशेष म्हणजे ही दारू दादरा आणि नगर हवेली या गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेशातून आणली जात होती.

Illicit Liquor Palghar
Chhagan Bhujbal : मी फार मोठी लोकं अंगावर घेतलीत, तू किस झाड की पत्ती है! भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

या दारू तस्करांनी अॅम्ब्युलन्समधील रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समध्ये दारू लपवली होती. राज्य उत्पादन शुल्काचे ए. आर. चौधरी यांना याची माहिती मिळताच त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर काल सकाळी 9 वाजता मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाच्या पार्किंगमधून एका अॅम्ब्युलन्सची (MH-04-FK-1236 तपासणी केली. तेव्हा स्ट्रेचरच्या खालील बॉक्समध्ये लपवलेली दारू सापडली. ही कारवाई करत असताना अॅम्ब्युलन्सचा चालक पळून गेला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्रास दारूची वाहतूक

या प्रकरणी 'सरकारनामा'ने अधिक माहिती घेतली असता दादरा नगर हवेलीमधून मुंबईसह ठाण्यात सर्रास दारूची वाहतूक केली जाते. याची पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना खबरदेखील लागत नाही. जेव्हा भरारी पथकाला माहिती मिळते तेव्हा कारवाई होते. पण तस्कर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असल्याने त्यांना पकडणे अवघड जाते.

फेब्रुवारी 2021 मधील कारवाई

कोरोनाकाळात दादरा नगर हवेलीमधून तस्करी केलेली 19 लाखाची दारू पालघर उत्पादन शुल्क विभागाने पकडली होती. त्यावेळी दारूचे 65 बॉक्स, रोख रक्कम तसेच पीकअप टेम्पो आणि कार ताब्यात घेतली होती. या प्रकरणी एकाला अटक देखील केली होती.

(Edited by - Avinash Chandane)

Illicit Liquor Palghar
Sanjay Raut: अदानींच्या घशात मुंबई जाऊ देणार नाही; राऊतांनी दंड थोपटले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com