Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, तब्बल 11 मंत्र्यांची दांडी ; काय आहे कारण ?

Maharashtra Politics : शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीला दांडी....
Eknath Shinde - Ajit Pawar Devendra Fadnavis
Eknath Shinde - Ajit Pawar Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा, धनगर, ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे.राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले असतानाच मंत्री अंबडमध्ये ओबीसी मेळाव्यातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं धगधगतं राजकारण आणि समोर महत्वाचे विषय आ वासून उभे असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला तब्बल अर्धा डझन मंत्र्यांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तसेच सात मोठे निर्णय देखील घेण्यात आले. पण या बैठकीला फक्त 18 मंत्री उपस्थित होते तर तब्बल 11 मंत्र्यांनी अनुपस्थित राहिले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मंत्री बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता सुरू झाली आहे.

Eknath Shinde - Ajit Pawar Devendra Fadnavis
Ramdas Kadam : 'मातोश्री' आता बाळासाहेबांचा राहिला नसून काँग्रेस, राष्ट्रवादीचा... - रामदास कदमांचा टोला!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली आहे.दिवाळीच्या सुट्टीमुळे मंत्री अजूनही मंत्रालयाकडे आले नाहीत. त्यामुळेच ते बैठकीला आले नसल्याचं सांगितलं जात आहे.(Cabinet Meeting)

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला महायुती सरकारमधील अवघे 18 मंत्री उपस्थित होते तर 11 मंत्री गैरहजर राहिले. त्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे जालन्यात ओबीसी रॅलीला उपस्थित होते.त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला येऊ शकले नाहीत.तर इतर मंत्री दिवाळीसाठी अद्यापही आपल्या मतदारसंघात आहेत.त्यामुळे तेही बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, दादा भुसे, तानाजी सावंत, विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार हे मंत्री उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणारे मंत्री :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला मंत्री, छगन भुजबळ, शंभूराज देसाई, उदय सामंत,अब्दुल सत्तार,अदिती तटकरे, हसन मुश्रीफ,अनिल पाटील, संजय राठोड, अतुल सावे, सुरेश खाडे राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण,धर्मरावबाबा आत्राम, संजय कुमार बनसोडे, संदीपान भुमरे ,गुलाबराव पाटील हे मंत्री अनुपस्थित राहिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde - Ajit Pawar Devendra Fadnavis
Bhujbal VS Jarange : दगडाला शेंदूर लावलेला देव ते सासऱ्याचं घरचं तुकडं मोडतो...: भुजबळांचा जरांगेंवर तुफानी हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com