

Maharashtra Politics : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी भाजप-सोबत एमआयएममध्ये युती झाली होती. कट्टर विरोधक एकत्र आल्याने या युतीची राज्यभर चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युती विरोधात थेट इशारा देत आपल्या आमदाराच्या विरोधात कारवाई केली. तर, एमआयएमचे प्रमुख यांनी देखील भाजपसोबत कुठल्याही परिस्थिती युती नाही, असे म्हणत युती तोडण्याचे आदेश दिले.
इम्तियाज जलील यांनी तत्काळ सूचना करत ही युती तोडण्यास सांगितले. एमआयएमच्या उमेदवारांकडून युतीतून बाहेर पडत असल्याचे घोषणा करण्यात आली.
राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना एमआयएम आणि भाजप एकत्र आल्याच्या या प्रकाराने भूंकपासारखी परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका एमआयएमला बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी अकोटमधील या स्थानिक आघाडीतील एमआयएमच्या समावेशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही तातडीने पावलं उचलत एमआयएमचे विदर्भातील निवडणूक प्रभारी आणि अकोला एमआयएमचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून लगेच या आघाडीतून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून एमआयएम युतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एमआयएम भाजपसोबत गेली या चर्चेने खळबळ उडालेली असताना इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना या विषयावर खुलासा केला. अकोट नगरपंचायत निवडणुकीत एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. इथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू यांची प्रहार संघटना, भाजप या सगळ्या पक्षांनी मिळून शहर विकासासाठी एक आघाडी तयार केली होती. सगळ्याच पक्षांना या आघाडीत सहभागी करून घेण्यात आले होते.
आमच्या पक्षाच्या पाच नगरसेवकांनीही या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु तो घेत असताना त्यांनी आमच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यामुळे त्यांनी या विकास आघाडीत जाण्याचा निर्णय परस्पर घेतला. या आघाडीत भाजप असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने अकोला येथील आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ निवडणूक प्रमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना या स्थानिक विकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात माझी असदुद्दीन ओवेसी यांच्याशीही चर्चा झाली आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत आमचा पक्ष जाऊ शकत नाही. विकासासाठी आघाडी असो की आणखी कशासाठी. भाजप असेल अशा कुठल्या आघाडीत एमआयएम कधीही सहभागी होणार नाही. अशावेळी विकासाला देखील आमचे दुय्यम स्थान असले, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
ज्या आमच्या पाच नगरसेवकांनी अकोट विकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यांना विदर्भातील आमच्या कोणी वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते का? याचीही आम्ही माहिती घेत आहोत. तसे निदर्शनास आले, तर संबंधित नगरसेवकांसोबतच त्या पदाधिकाऱ्यांवरही पक्ष कडक कारवाई करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.