Shiv Sena rebellion: पाडापाडीने उद्धव सेनेत अस्वस्थता; जिल्हा प्रमुखाविरुद्ध शहर प्रमुखाने थोपटले दंड, पक्षातील यादवी चव्हाट्यावर!

municipal election Maharashtra News : उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या विरोधात शहर प्रमुखाने बंडाचे निशाण फडकावले असल्याने उबाठाच्या सैनिकांना आपल्याच लोकांचा सामना करावा लागत आहे.
uddhav Thackeray
uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्र्यांच्या शहरात उद्धव सेनेची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. त्यातच वाटाघाटी पूर्ण झाल्या असताना काँग्रेसने शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी तोडली. त्यामुळे दोन नगरसेवकांच्या उद्धव ठाकरे सेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढा द्यावा लागत आहे. त्यात उद्धव सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या विरोधात शहर प्रमुखाने बंडाचे निशाण फडकावले असल्याने उबाठाच्या सैनिकांना आपल्याच लोकांचा सामना करावा लागत आहे.

शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी दोन दशकापासून आपल्या प्रभागात भगवा उंचावून ठेवला आहे. युतीत असताना आणि नसतानाही ते आजवर महापालिकेच्या निवडणुकीत चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत उद्धव सेनेला फक्त दोनच जागा जिंकता आल्या होत्या. त्यात किशोर कुमेरिया यांचा समावेश आहे. त्यांच्याच प्रभागातून मंगला गवरे यासुद्धा निवडून आल्या होत्या. हे दोघेही पुन्हा एकदा निवडणूक लढत आहे. मात्र, कुमेरिया ज्या खुल्या प्रवर्गातून लढले त्याच जागेवर शहर प्रमुख नितीन तिवारी यांनीसुद्धा बंड पुकारले आहे.

uddhav Thackeray
Congress News : 6 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा बदला... महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला भर रस्त्यावर वार करून संपवलं; आरोपी अटकेत

कुमेरिया यांना ओबीसीसाठी राखीव जागेवर लढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. ही जागा शिवसेनेने आपल्यासाठी सोडली होती. एबी फॉर्मसुद्धा दिला होता, असा दावा शहर प्रमुख नितीन तिवारी यांचा आहे. ओबीसी जागेवर भाजपचे विजय झलके निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात लढल्यास पराभव होईल अशी भीती कुमेरिया यांना होती. भाजपसोबत त्यांचे साटेलोटे आहे, असा आरोप यापूर्वीच तिवारी यांनी केला आहे.

uddhav Thackeray
BJP Vs Shivsena : ठाकरे बंधूंची टीका दानवेंच्या जिव्हारी : CM फडणवीसांसमोरच दाखवली उद्धव ठाकरेंना जागा

कुमेरिया यांच्यानंतर अर्ज दाखल केल्याने तिवारी यांचा एबी फॉर्म रद्द झाला आहे. त्यानंतरही त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या महिला उमेदवार माजी नगरसेविका मंगला गवरे यांच्यासोबत ते संयुक्तपणे प्रचार करीत आहेत. यावरून उद्धव ठाकरे सेनेतच दोन गट निर्माण झाले असल्याने याचा फटका जिल्हा प्रमुखांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

uddhav Thackeray
NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या पाच उमेदवारांवर कारवाई! पुण्यात निर्माण झाला राजकीय पेच

दुसरीकडे जिल्हा प्रमुख कुमेरिया यांचे समर्थकांच्या माहितीनुसार तिवारी यांनी भाजपची (BJP) सुपारी घेतली आहे. शिवसेना सोडून गेलेले नागपूरचे माजी संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी त्यांना फूस आहे. तिवारी त्यांचे कट्टर समर्थक आहेत. बंडखोरी करणाऱ्या तिवारी यांच्याविरुद्ध अद्याप पक्षातर्फे कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. साधे निलंबनसुद्धा करण्यात आले नाही.

uddhav Thackeray
BJP Vs Shivsena : भाजपने आयात केलेल्या 3 टर्मच्या माजी आमदाराला शिवसेनेने लोळवले; एकनाथ शिंदेंचा वाघाने दाखवली जागा

मुंबईतून जिल्हा प्रमुखांना पाडण्यासाठी काही नेते तिवारी यांना बळ देत आहेत. आमदार वरुण सरदेसाई यांचाही यात समावेश असल्याच्या उबाठाच्या शिवसैनिकांचा आरोप आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांना नितीन तिवारी एवढेच प्रिय असतील तर त्यांना सोबत शिंदे सेनेत घेऊन जावे, तिवारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कुमेरिया यांच्या समर्थकांनी केली आहे.

uddhav Thackeray
Nanded Shivsena: ऐन महापालिका निवडणुकीतच शिवसेनेमध्ये भडका! संपर्क प्रमुखांसमोरच आमदार हेमंत पाटलांना शिवसैनिकांनी वाहिली शिव्यांची लाखोली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com