Nagpur News : भाजपने ठरवून काही महापालिकांमध्ये शिंदे सेना आणि अजित पवार यांच्यासोबत युती केली तर काही ठिकाणी मुद्दाम तोडली आहे. त्यांना सर्वच राजकीय पक्षांना संपवायचे आहेत. त्यांना शक्तिहीन करायचे आहे असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी भाजपशिवाय दुसऱ्या कोणासोबतही आमची युती होणार नाही यासाठी दबाव तंत्राचा वापर केल्याचे सांगताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी कोणालाही मतदान करा मात्र भाजपला करू नये असे आवाहन केले.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली आहे. असे असतानाही सहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणीती शिंदे या भाजपात जाणार असल्याचा खळबळजनक आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेससुद्धा अस्वस्थ झाली आहे. काँग्रेसचे नेतेही यावर नाराज आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने काँग्रेसचा एकही नेता सध्या या विषयावर बोलण्यास तयार नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी आज भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ते नेमके कोणाच्या बाजूने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महामेट्रो, रेल्वेचे ऑडिट रिपोर्ट आले असून त्यात पावणे दोन हजार कोटींचा तोटा दाखवण्यात आला असल्याचे सांगितले.
येत्या पाच वर्षात मेट्रो महानगर पालिकेला सोपवली जाईल. त्यानंतर महापालिकेच्या बजेटमधून पावणे दोन हजार कोटी मेट्रोच्या तोट्यावर खर्च केले जाणार असल्याचा दावाही यावेळी केला. तोट्यातील मेट्रो महापालिकेच्या गळ्यात बांधली जाऊ नये याकरिता भाजपला मत देऊ नका असेही ते म्हणाले.
वंचितने नागपूरमध्ये कुठल्याच पक्षासोबत युती वा आघाडी केलेली नाही. मात्र जे सत्तेत एकत्र बसले आहेत आणि विरोधात एकत्र आहेत त्यांनीसुद्धा येथे युती केलेली नाही. मात्र चर्चा आणि वाटाघाटीतून सत्ताधारी पक्षाने आमच्यासोबतच युती करा, इतरांसोबत युती होऊ यासाठी दबावतंत्राचा वापर केला असल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर केला. हा लोकशाहीला धोका आहे. सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकले पाहिजे. याकरिता मतदारांनी भाजप सोडून कोणालाही मतदान करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.