MPSC News : राज्य सरकारच्या पत्राला एमपीएससीकडून केराची टोपली; विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही निर्णयात बदल नाहीच !

Maharashtra Public Service Commission News : एमपीएससी आणि माहिती व जनसंपर्क विभागाची एकमेकांकडे टोलवाटोलवी
MPSC News :
MPSC News : Sarkarnama
Published on
Updated on

MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे माहिती व जनसंपर्क विभागाने पदव्युत्तर पदवी धारकांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करता आपण उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ या पदांच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या पात्रतेत बदल करून पदव्युत्तर पदवी धारकांना संधी द्यावी. या पत्राला आयोगाने आम्ही नियमांवर चालतो पत्रावर नाही, अशी भूमिका मांडत केराची टोपली दाखवली आहे. (Latest Marathi News)

उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ या पदांच्या जाहिरातीमधील पदव्युत्तर पदवी धारकांना संधी न मिळाल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. याची दखल घेत माहिती व जनसंपर्क विभागाने एमपीएससीला या विद्यार्थ्यांना आयोगाने सामावून घ्यावे व परीक्षा देण्याची संधी द्यावी असे पत्र दिले आहे .

MPSC News :
Sanjay Raut On Ajit Pawar : आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार, यामध्ये अजित पवारसुद्धा येतात; राऊतांचं प्रत्युत्तर !

आम्ही आयोगास दिलेल्या सेवाशर्तीमध्ये पदवी धारक परीक्षेस बसू शकतात, त्यामुळे अर्थातच पदव्युत्तर पदवी धारकांना परीक्षा देण्यास काही अडचण नाही. मात्र आयोग ताठर भूमिका घेऊन विनाकारण विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम करीत आहे असे मत, माहिती व जनसंपर्क विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मांडले.

MPSC News :
Pimpri-Chinchwad : होर्डिंग दुर्घटना प्रकरण; विविध पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाला घेरलं

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी ‘उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ पदांसाठी जम्बो पदभरतीची जाहिरात प्रसिध्द केली. जाहिरात प्रसिद्ध होऊन तीन दिवस होऊन गेले तरी सुधारित सेवा प्रवेश नियम माहिती विभाग तयार करू शकले नाही. याबाबत विभागाने तकलादू भूमिका घेऊ नये. सुधारित सेवा प्रवेश नियमात संदिग्धता न ठेवता स्पष्टपणे ‘पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी’ अशा उल्लेख करत नवीन सेवा नियमानुसार पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा घेण्यात याव्यात अशी, भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली

याबाबत प्रतिक्रिया देताना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, "पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी’ धारकांना उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी’ या पदांकरीत पात्र धरून परीक्षा देण्याची संधी द्यावी असे पत्र आयोगास दिले आहे.

MPSC News :
Abdul Sattar News : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन, तीन मंत्र्यांसाठी हेलिपॅडची तयारी...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अवताडे म्हणाले, "माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवा शर्तीच्या नियमानुसार आम्ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे . पदव्युत्तर पदवी’ धारकांना संधी द्यायची असेल, तर माहिती व जनसंपर्क विभागाने नियमांमध्ये बदल करून घ्यावा. आयोग नियमांवर चालते पत्रावर नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com