Kalwa Hospital Patient Deaths : ठाणे महापालिका रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी आव्हाड- जाधवांनी काढली डॉक्टरांची खरडपट्टी

Thane Hospital Deaths : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावल्याने रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Kalwa Hospital Patient Deaths
Kalwa Hospital Patient Deaths Sarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावल्याने रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. १७ रुग्णाचा एकाच रात्रीत मृत्यू झाल्यामुळे परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटही चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात पाच रुग्ण दगावल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांची खरडपट्टी काढली होती. आजच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुन्हा रुग्णालय गाठून प्रशासनाला आणि डॉक्टरांना चांगलंच धारेवर धरलं. मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हेदेखील चांगलेच आक्रमक झाले होते. याचवेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचेही सांत्वन केले. (Thane Hospital News)

Kalwa Hospital Patient Deaths
Kalwa Hospital News : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावले: नातेवाईक संतप्त

जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या या प्रकारावर संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. परवा रात्रीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतरही मी आलो होतो. या रुग्णालयातील प्रशासन बेशिस्त आहे.या रुग्णालयात फक्त येण्याचा मार्ग आहे. पण बाहेर जाण्यासाठी मार्गच नाही, पण सरकराचे डोळे कधी उघडणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Kalwa Hospital Patient Deaths
Supriya Sule On Thane Hospital Incident : ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १७ रूग्ण दगावले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणतात...

सोबतच मनसेचे अविनाश जाधव यांनीही रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांचा समाचार घेतला.'मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच रुग्णांचे मृत्यू होत असतील, तर आम्हाला अशा मुख्यमंत्र्यांची गरजच नाही. गेल्या वेळी रुग्ण दगावल्यानंतर आम्ही आंदोलन केलं होतं.तेव्हा डॉक्टरांनी मनसेकडून त्यांना धोका असल्याचे सांगितलं. पण सरकारने तेव्हाच आमचं ऐकलं असतं तर आज एवढ्या रुग्णांचे मृत्यू झालेच नसते. त्यामुळे आतातरी मुख्यमंत्र्यांनी अशा नाकर्त्यांना डॉक्टरांना काढून टाकावं, नाहीतर भविष्यात रुग्णालयात मृतांचे तांडव वाढत जाईल.' अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी यावेळी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com