Pawar Ambegaon Sabha : पवारांचा शब्द; 'आंबेगावात लवकरच सभा घेणार, मी अन्‌ खासदार कोल्हे सविस्तर बोलणार'

Sharad Pawar On Walse Patil : आंबेगावलासुद्धा एक जाहीर सभा घेण्यात यावी, असा एक आग्रह आहे. त्यासंबंधीची पूर्तता मी नक्कीच करेन.
Sharad Pawar-Dilip Walse Patil-dr. Amol Kolhe
Sharad Pawar-Dilip Walse Patil-dr. Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोडून गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा धडाका लावला आहे. पहिली सभा त्यांनी आंबेगावला घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, आतापर्यंत आंबेगावात पवारांची सभा झालेली नाही. पण आता खुद्द पवारांनीच आंबेगाव येथे येऊन लवकरच सभा घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तसेच, त्या सभेत मी आणि खासदार सविस्तरपणे बोलेन, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे नेमके काय बोलणार, याकडे आंबेगावचे लक्ष असणार आहे. (I Will hold meeting in Ambegaon soon: Sharad Pawar)

जुन्नरमधील आदिवासी विकास परिषद आटोपून शरद पवार हे पुण्याकडे येत होते. त्यावेळी मंचर बाजार समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी पवारांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी पवार म्हणाले की, मी राज्यात अनेक ठिकाणी जातो. आंबेगावलासुद्धा एक जाहीर सभा घेण्यात यावी, असा एक आग्रह आहे. त्यासंबंधीची पूर्तता मी नक्कीच करेन. मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे त्या सभेत सविस्तरपणे बोलेन.

Sharad Pawar-Dilip Walse Patil-dr. Amol Kolhe
Pawar In Ambegaon : वळसे पाटलांच्या आंबेगावातून पवारांचा राष्ट्रवादी बंडखोरांबाबत कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आंबेगावचे आमदार आणि पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील गेल्याने अनेकांना धक्का बसला. खुद्द शरद पवारांनीही याबाबतची खंत बोलून दाखवली आहे. ‘पदांबाबत आंबेगावला कायम झुकते माप देऊनही...’ अशा शब्दांत त्यांनी सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली होती.

सभेसाठी आंबेगावची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, पवारांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली. त्या ठिकाणी पवारांचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर पवारांनी राज्यात सर्वत्र स्वाभिमान सभांचा धडाका लावला. येवल्यानंतर पवारांनी धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये जाऊन बंडखोरांचा समाचार घेतला. या सभेत पवार मुंडेंपेक्षा अमरसिंह पंडित यांच्यावरच जास्त बरसले. तसेच अमरसिंह पंडित यांचे कट्टर राजकीय विरोधक बदामराव पंडित यांची घेतलेली भेटही चर्चिली गेली.

Sharad Pawar-Dilip Walse Patil-dr. Amol Kolhe
Ajit Pawar To Atul Benke : अजितदादांनी डाव टाकला; पवारांनी गाडीत फिरवलेल्या बेनकेंवर आली नवी जबाबदारी...

बीडनंतर पवारांनी कोल्हापुरात सभा घेत हसन मुश्रीफ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्या सभेचे अध्यक्षपद खुद्द शाहू महाराजांना देण्यात आले होते. त्या सभेत शाहू महाराजांनी पक्षांतर बंदी कायद्याबाबत सविस्तर परार्मश घेतला होता. तत्पूर्वी जळगाव जिल्ह्यातही पवारांची सभा झाली आहे. या सर्व सभांना जनतेतून विशेषतः तरुण वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Sharad Pawar-Dilip Walse Patil-dr. Amol Kolhe
Sharad Pawar Junnar Tour : तटस्थ आमदार बेनकेंना पवार आपल्या गाडीतून कार्यक्रमाला घेऊन गेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com