Mumbai High Court : आव्हाड-पडळकर समर्थक हाणामारी प्रकरण न्यायप्रविष्ठ...तोपर्यंत तपास करू नका; मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Padalkar Vs Awhad : पावसाळी अधिवेशनातील आव्हाड-पडळकर समर्थकांमधील हाणामारीच्या चौकशीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत पोलिस तपास थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Gopichand Padalkar-Jitendra Awhad
Gopichand Padalkar-Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस तपासाला स्थगिती दिली आहे.

नितीन देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, ‘गुन्हा राजकीय हेतूने दाखल’ असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार असून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत मरीन ड्राईव्ह पोलिस तपास थांबवण्यात आला आहे.

Mumbai, 02 October : पावसाळी अधिवेशन चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या हाणामारीच्या चौकशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता न्यायालयीन सुनावणी पूर्ण होईपर्यंत पोलिस तपास थांबवण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे जोपर्यंत हे प्रकरणात न्यायालयात आहे, तोपर्यंत मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी याबाबतची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यानुसार मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तपास करू नये, असे म्हटले आहे.

दरम्यान, नितीन देशमुख यांच्या याचिकेवर आता १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे सुमारे सव्वा महिन्यानंतर त्याची सुनावणी होणार आहे.

Gopichand Padalkar-Jitendra Awhad
Chandrakant Patil : जयंतरावांसह पवारांच्या पाच बड्या शिलेदारांना घेरण्यासाठी चंद्रकांतदादांचा नवा डाव; आव्हाडांसाठी स्वतःच उतरणार मैदानात

संशयित आरोपी नितीन देशमुख यांच्या वतीने उपस्थित सुनावणीदरम्यान ‘या प्रकरणात आपल्यविरोधात आरोप आणखी सिद्ध झालेले नाहीत,’ असा दावा केला आहे. राजकीय हेतूने आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे ही तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. तसेच, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत पोलिसांच्या तपासाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी, मागणी केली आहे.

विधीमंडळाच्या आवारात झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले होते. त्या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त करून पुन्हा असे प्रकरण होणार नाही, असा सूर विधानसभेतील चर्चेत मान्यवरांच्या भाषणातून निघाला होता.

Gopichand Padalkar-Jitendra Awhad
Ajit Pawar On Padalkar : पडळकरांच्या विधानाबाबत अजित पवारांना फडणवीस, चव्हाणांकडून 'ही' अपेक्षा; ‘त्या’ परंपरेची करून दिली आठवण

प्रश्न 1 : हाणामारीची घटना कुठे घडली?
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन आवारात.

प्रश्न 2 : या प्रकरणी पोलिस तपास कुठे दाखल आहे?
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात.

प्रश्न 3 : पुढील सुनावणी केव्हा होणार आहे?
१२ नोव्हेंबर रोजी.

प्रश्न 4 : नितीन देशमुख यांनी कोणता दावा केला?
प्रकरण राजकीय हेतूने दाखल करण्यात आले असल्याचा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com