Rahul Gandhi in Surat : सूरत पाकिस्तानात आहे का? अडवणुकीनंतर नाना पटोलेंचा संतापजनक सवाल

Congress vs BJP : सूरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक
Nana Patole, Rahul Gandhi
Nana Patole, Rahul GandhiSarkarnama

Maharashtra Congress and Gujrat Police : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयीन कामासाठी सूरतमध्ये आले होते, पण सूरत शहर व आपसासच्या परिसरात भाजप सरकारने जुलूम व अत्याचार केले. सूरत शहरात कोणीही येऊ नये यासाठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सूरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली. यावरून सूरत काय पाकिस्तानात आहे का, असा संतापजनक सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

Nana Patole, Rahul Gandhi
Ambadas Danve On Bjp : मैदानाची गोमूत्र शिंपडून शुद्धी म्हणजे भाजपचा शुद्ध ढोंगीपणा..

गुजरात पोलिसांच्या वर्तवणुकीबाबत माहिती देताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, "महाराष्ट्रातून सूरतला जाणाऱ्यांना सीमेवर अडवण्यात आले. सूरतमध्ये येण्यास पोलिसांची मनाई होती. सूरत व परिसरात 'कर्फ्यु'सारखी परिस्थिती दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांचे फोन जप्त करण्यात आले. आयडी कार्ड जप्त करण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंगही करु दिले नाही. सूरत भारतात आहे का पाकिस्तानात असे चित्र दिसत होते. हा प्रकार लोकशाही संपुष्टात आणण्याचा आहे."

Nana Patole, Rahul Gandhi
Thackeray Group on Savarkar : सावरकरांवरुन आता ठाकरे गटही मैदानात; राज्यात राबविणार 'घर घर सावरकर' मोहीम

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही गुजरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरात म्हणाले की, "राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सूरत येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेतले. त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे."

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही गुजरात पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध केला. ते म्हणाले की, "सूरतला जाणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे, आता मुक्त भ्रमणाचा अधिकारही काढून घेण्यात आला आहे की काय?"

Nana Patole, Rahul Gandhi
Market Committee Election : दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन जागा बिनविरोध; मात्र कल्याणशेट्टींचे कडवे आव्हान : अक्कलकोटला सिद्रामप्पांविरोधात तानवडे-पाटील-शिंदे

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशासाठी, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. या लढाईत त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते मोठ्या संख्येने सूरतमध्ये येत होते. त्यावेळी गुजरात पोलिसांनी त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबवले. राहुल गांधींना या लढाईत जनतेची साथ मिळू नये याची जणू खबरदारीच गुजरात पोलीसांनी घेतली होती, याचा आम्ही निषेध करतो, असे पटोले, चव्हाण आणि थोरात यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com