Politics : भाजपचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे पत्र आले असून त्यामध्ये शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेलारांनी बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता शेलार यांना धमकी आल्यामुळे भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे.
आशिष शेलार यांना आज (ता.27 जानेवारी) सकाळी त्यांच्या कार्यालयातील टपालमध्ये एक निनावी पत्र आलं. त्या पत्राच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शेलार यांनी याबाबत बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
या पत्राच्या माध्यमातून शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देत हातपाय तोडणार आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीच्या पत्रात नमूद करण्यात आला आहे. हे पत्र शेलारांच्या कार्यालयातील टपालात मिळालं. पण धमकी देणारा व्यक्ती नेमकी कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.