Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समजते आहे. सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, यांच्यासह भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व आमदार गोपीचंद पडळकर यांनाही मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
भाजप व शिंदे गटाच्या आमदारांचे सांगली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर दबदबा आहे. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपदासाठी मोठा दावेदार मानले जात आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बाबर यांचा विचार न झाल्याने त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. पुढील होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना आतातरी संधी मिळेल, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थक करताना दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यात सांगली व मिरज या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यापैकी मिरजचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. खाडे यांना मंत्रिपद देण्यात आले, त्यावेळी सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याही नावाचा दावा करण्यात येत होता.
गाडगीळांना मंत्रिपद नाकारण्यात आल्यामुळे त्यावेळी त्यांचे समर्थक कार्यकर्ते ही नाराज झाले होते. विस्तारात तरी त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा समर्थकांमधून व्यक्त होत आहे. पुढील विस्तारामध्ये तरी त्यांना संधी मिळावी अशी आशा त्यांना आहे. भाजपचे विधान परिषेदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येत आहे.
सांगली जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद :
सांगली जिल्ह्याला आतपर्यंत केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी , सरकारच्या काळात सांगलीला तीन ते चार मंत्रिपदे बहाल होत होती. भाजप सरकारच्या काळात मात्र जिल्ह्याचे राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रस्थ घटलले आहे. ही कमी भरून काढण्यासाठी मंत्रिपद मिळावे, अशी आशा सांगलीतून व्यक्त होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.