Tirupati Devsthan : तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी ठाकरे-फडणवीसांचे विश्वासू सहकारी; नार्वेकरांच्या नावामुळे आश्चर्य

Milind Narvekar-Amol Kale News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे.
Milind Narvekar-Amol Kale
Milind Narvekar-Amol Kale Sarkarnama

Mumbai News : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर शिवसेनेचे सचिव तथा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांची पुन्हा वर्णी लागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ते तिरुपती देवस्थानचे विश्वस्त होते. नार्वेकर यांच्याबरोबरच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमोल काळे यांनाही तिरुपती देवस्थानवर संधी मिळाली आहे. (Milind Narvekar, Amol Kale nominated as Trustees of Tirupati Devsthan)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे. त्यात मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे यांना संधी मिळाली आहे. फडणवीस यांचे विश्वासू असल्यामुळे अमोल काळे यांची वर्णी लागणे सहाजिक आहे. मात्र, ठाकरेंचे खासगी सचिव नार्वेकर यांना शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीचे सरकार असतानाही नार्वेकर यांना संधी मिळाल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

Milind Narvekar-Amol Kale
Kolhapur Loksabha : कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत पवारांचे मोठे भाष्य; ‘शाहू महाराजांनी लोकसभा लढवायची भूमिका घेतली तर आनंदच’

मिलिंद नार्वेकर हे जरी शिवसेनेचे सचिव असले तरी त्यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. अगदी ठाकरेंच्या निशाणावर असलेले एकनाथ शिंदे यांच्याशीही नार्वेकरांची गट्टी कायम आहे. बंडानंतर आलेल्या पहिल्या गणेशोत्सवात नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी बोलावले होते. विशेष म्हणजे शिंदेही नार्वेकरांच्या घरी गेले होते.

नार्वेकर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातही तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या प्रयत्नानंतर नवी मुंबईत बालाजी मंदिर बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे नार्वेकर यांची तिरुपती देवस्थानवर पुन्हा वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.

Milind Narvekar-Amol Kale
Ajit Pawar Baramati Visit : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजितदादा प्रथमच होमपिचवर; बारामती लोकसभेवर बोलणार का? याकडे राज्याचे लक्ष

दरम्यान, नार्वेकर यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनाही या वर्षी विश्वस्त म्हणून संधी मिळाली आहे. काळे हे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत जेव्हा आशिष शेलार यांना भारतीय क्रिकेट मंडळाचे खजिनदार म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली, तेव्हा फडणवीसाच्या गोटातील काळे यांचे नाव पुढे आले होते.

Milind Narvekar-Amol Kale
Rohit Pawar Appeal To Kolhapurkar : ‘कोल्हापूरकरांनी ठरवलं की ते करूनच दाखवतात....खटक्यावर बोट अन्‌ जागेवर पलटी’

विशेष म्हणजे तेव्हा शरद पवार आणि आशिष शेलार गटाकडून काळे यांनी निवडणूक लढली आणि जिंकली हेाती. मात्र, काळे यांच्या उमेदवारीसाठी शेलार यांनी पवारांकडे शिष्टाई केली होती. आज त्याच काळेंना तिरुपती देवस्थानवरही संधी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com