Jayant Patil News : राज्यात कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीवरून आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. कारण कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा, असा या सरकारचा नारा असल्याचे पाटील यांनी म्हटले.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असल्याच्या वावड्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अद्यापही कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उटवण्यात आलेली नाही. या केवळ अफवाच आहेत. याबाबत स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा, असा या सरकारचा नारा असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
याबाबत जयंत पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, राज्यात चालू रब्बी हंगामात 4 लाख 32 हजार 798 हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगामअखेर सुमारे 86 लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल, तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते आणि शेतकऱ्यांचे पुन्हा अजून नुकसान होऊ शकते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकानं घेतली आहे. त्यामुळं कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे. कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यातून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उटवल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्या फक्त अफवा असल्याचे त्यांनी म्हटले.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.