Jayant Patil On State : जयंत पाटलांनी केली रणनिती स्पष्ट; राष्ट्रवादी काँग्रेस घेणार मोठा निर्णय

Jayant Patil On Eknath Shinde अजित पवार आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गोटात असंतोष
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Crisis And Jayant Patil : अजित पवारांसह इतर आठ जण सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. ज्यांच्याशी भांडलो, ज्यांच्यावर टीका करून महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, आता त्यांच्याबरोबर बसायचे का, असा प्रश्न ते विचारत आहेत. गेल्या वर्षी धोका पत्करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता हे आयत्या सरकारमध्ये सहभागी झाले. ही मंडळी वरचढ होणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्याचे परिणाम लवकरच समोर येतील, असे प्रतिपादन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. (Latest Political News)

Jayant Patil
Khatav News : वनविभागाची कारवाई; वर्धनगडावरील दर्ग्याभोवतालचे अतिक्रमण हटवले

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी (ता. ४) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रिपदांचे वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांना छेडले. यावेळी पाटील म्हणाले, "आज मंत्रिपदावाटप होणार आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारमधील धूसपूस समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या मंत्र्यांनी भेट घेतली. पूर्वीच्या सरकारमधील अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर आरोप करून बाहेर पडलो, त्यांच्यासोबत बसायचे का, असे ते बोलत आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे."

यावेळी खरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असल्याचा दावाही पाटील यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच आहे. या पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. या पक्षाचे ५३ आमदार आहेत. त्यातील नऊ जणांची हाकालपटी केली आहे. बाकी सर्व आमचे आमदार आहेत. आता काही आमदार तटस्थ आहेत. मात्र राज्यातील कार्यकर्तांचे मोठ्या प्रमाणत शरद पवारांना समर्थन आहे. त्यामुळे सध्या न्यायालयात जाण्याची गरज नाही. सध्या सगळे व्यवस्थित सुरू आहे."

Jayant Patil
Shinde Group Upset : आता नाराज होऊन काय फायदा? अर्धी अर्धी भाकरी खावी लागणार; अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर शिंदे गटाची हतबलता

यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. थोड्याच दिवसांत नाशिक, बीड, नगर, सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार आहेत. राज्यात पवारांकडे पाहून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले. यामुळे पवार जनतेच्या भेटीला जाणार आहे. पाऊस असो वा नसो ते बाहेर पडणार आहेत. तत्पुर्वी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल."

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.