Jayant Patil : जयंत पाटील फडणवीसांना गिफ्ट देणार; पण 2024 मध्ये, काय आहे त्यांच्या मनात ?

आम्हीच फडणवीसांना २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil : फडणवासांच्या विधानावर भाष्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांन भाष्य केले आहे. आम्हीच फडणवीसांना २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ असे ते म्हणाले. या वर्षाचे सर्व सरप्राईज आता संपले आहेत. २०२४ साली अनेक सरप्राईजेस देऊ, असे फडणवीस म्हणाले होते. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Jayant Patil
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकर सहभागी; पाहा फोटो !

लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. 2024 ला महाविकास आघाडी सत्तेत येईल, हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राइज असेल, पुढच्या वर्षी आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार; असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

२०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोकं हुशार असतात. आपण ज्याला मत दिली तो सध्या कुठंय, हे ते पाहतील. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. शिवसेनेच्या मतदारसंघात जावून मी कधीही राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू म्हणालेलो नाही. शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच होईल, असं पाटील म्हणाले.

Jayant Patil
Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरे, संजय राऊतांनंतर शिवसेनेच्या आणखी एक नेत्या भारत जोडो यात्रेत सहभागी

विकासासाठीचे व्हिजन मांडतांना:

महाराष्ट्रात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. एखाद्या उद्योजकाला विदर्भ, मराठवाडा, खान्देशात संधी देण्याची इच्छा असायला हवी. पुणे, मुंबई, नाशिकच्या पुढे उद्योग कसे जातील याकडे लक्ष देण्यची गरज आहे. मागे राहिलेल्या भागाला पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे आहे, अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

“मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आम्ही सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कुलची कल्पना चांगल्या प्रकारे राबवली. सांगली जिल्ह्यातील ६०० शाळांपैकी जवळजवळ ४०० शाळा मॉडेल स्कुल म्हणून ओळखल्या जात आहेत. हात धुण्याचे ठिकाण, टॉयलेट, वर्गखोल्या, शिवकण्यासाठीचे साहित्य यावर काम करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम आम्ही सांगली जिल्ह्यात केले. सांगली जिल्ह्यात शाळांची शैक्षणिक आणि इतरही क्षेत्रांत प्रगती झालेली आहे,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले, “प्राथामिक आरोग्य केंद्रांवरही आम्ही काम केले. सांगली जिल्ह्यात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रांत सर्व औषधं असावीत, कर्मचारी कायमस्वरुपी असावेत यावर आम्ही काम केलेलं आहे. उद्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येऊन माझ्या जिल्ह्यात भाषण केले आणिआरोग्य, शिक्षण क्षेत्रातील बदल घडवण्याचे आश्वासन दिल्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मी अगोदरच केलेल्या आहेत,” असेही जयंत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com