Jayant Patil ED Enquiry News : ईडीने जयंत पाटलांना कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले; IL&FS कंपनीची इनसाइड स्टोरी...

Jayant Patil News : जयंत पाटील यांच्या चौकशीमुळे राष्ट्रवादी आक्रमक
Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil ED Enquiry News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patal) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज (ता. 22) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. IL&FS या कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिता झाल्याचा ठपका ठेवत ईडीने जयंत पाटीस यांना नोटीस बजावली आहे.

ईडीने (ED) आयएल अॅण्ड एफएस या कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अनियमिता झाल्याचा ठपका ठेवला आहे. यानंतर या कंपनीशी संबंधित सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याच कंपनीच्या संबंधी २०१९ या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ही ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार राज ठाकरे यांची चौकशी झाली होती.

Jayant Patil News
Jayant Patil ED Enquiry News : जयंत पाटील दोन पुस्तकं घेऊन ईडी कार्यालयात; काय आहे कारण?

IL&FS मध्ये कथित कर्ज घोटाळा व मनी लाँड्रिंगचे प्रकरण 2019 मध्ये समोर आले होते. प्रथम ईडीकडून स्थानिक स्तरावर तपास करण्यात आला. ज्यामध्ये सापडलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने 2019 मध्ये तपास सुरू केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने IL&FS समूहाच्या कंपन्या IRL, ITNL या कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

IL&FS ने कोहिनूर CTNL ला कर्ज दिले होते. इक्विटी गुंतवणूक सुद्धा केली होती. CTNL ने कर्ज भरण्यात चूक केली आहे. राज ठाकरे हे CTNL मध्ये भागीदार होते. नंतर त्या कंपनीचे शेअर्स विकून ते बाहेर पडले. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. आता याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यामुळेच त्यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे. गेल्या काही काळापूर्वी या कंपनीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता दिसून आली होती. या कंपनीने मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप देखील झाला होता.

Jayant Patil News
Jayant Patil ED Notice : जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या लोकांकडून सत्ताधाऱ्यांची काही अपेक्षा असेल; पण...

याच, दरम्यान 2019 मध्ये कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. त्यानंतर पोलिसांनी कंपनीवर मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये अरुणकुमार साहा यांची चौकशी झाली होती. याच आयएल आणि एफएलएसने एका कंपनीला कर्ज दिले होते. या कंपनीचे कनेक्शन जयंत पाटलांशी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ईडी कार्यालयात जात असताना जयंत पाटील म्हणाले होते, IL&FS या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही. माझा या कंपनीच्या कुणाशीही संबंध आलेला नाही. ईडीने चौकशीला बोलावले आहे, म्हणून आपण जात आहोत. ईडीला चौकशीमध्ये पूर्ण सहकाऱ्य करणार असल्याचेही पाटील म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com