Jayant Patil : ‘माझं काही खरं नाही’ असे सांगून खळबळ उडविणारे जयंतराव दुसऱ्याच दिवशी म्हणतात, ‘माझं भाषणं करणंही आता अवघड झालंय’

Maharashtra Political News : ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ कारण काय तर माझ्याबद्दल तुमच्या मनात नेहमी शंका असते, त्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टींना शंभर वेळा सांगत होतो, महाविकास आघाडीकडून निवडणुकीला उभं राहावा. बंटी पाटील त्याचे साक्षीदार आहेत.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 March : ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ असे धक्कादायक विधान माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत शक्तीपीठ आंदोलकांच्या समोर बोलताना केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भाने मी बोललो. माझं काही खरं नाही, मी इकडे, असं मी कशाला बोलेन. आता माझं भाषण करणं चोरीचं आणि अवघडच झालंय, अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलावून दाखवली.

मुंबईत शक्तीपीठ विरोधक शेतकऱ्यांसमोर बोलताना जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे अगोदरच भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळाले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी तातडीने सफाईदारपणे स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. जयंत पाटील यांनी याअगोदरच्या एका कार्यक्रमाला शरद पवार यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलावले होते, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चालली होती.

ते म्हणाले, राजू शेट्टी (Raju Shetti) यांना उद्देशून मी आधी बरंच भाषण केलेले आहे. त्यात मी म्हटलेलं आहे की, तुम्ही आमच्याबरोबर राहिला असता तर आज लोकसभेत खासदार म्हणून गेला असता. त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न मांडला असता. त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल, त्यामुळे लोकसभेला ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, माझ्यावर काय विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. कारण, राजू शेट्टी यांचंच काही काळापूर्वी हे म्हणणं होतं. त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ काढून इकडं पक्षात जाणार की तिकडं पक्षात जाणार, असा काढण्याची काहीही आवश्यकता नाही. आता माझं भाषणं करणंही चोरीचं झालेले आहे.

Jayant Patil
Nitesh Rane : कडक शिस्तीच्या फडणवीसांकडून एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधान करणाऱ्या राणेंना एवढा 'फ्री हँड' का..?

राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नसतो, असा यापूर्वीचा माझा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भाने मी बोललो. माझं काही खरं नाही, मी इकडे, असं मी कशाला म्हणेन. आता माझं भाषण करणं अवघडच झालंय, अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ कारण काय तर माझ्याबद्दल तुमच्या मनात नेहमी शंका असते, त्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टींना शंभर वेळा सांगत होतो, महाविकास आघाडीकडून निवडणुकीला उभं राहावा. बंटी पाटील त्याचे साक्षीदार आहेत, शंभर वेळा सांगत होतो. निरोप देऊन देऊन दमलो, आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहावं. पण टाईम टू टाईम विषय असतो, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.

Jayant Patil
Mahayuti Government : महायुतीला लोकांनी प्रचंड बहुमत दिले; पदरात काय पडले? अशांतता, गोंधळ...

जयंत पाटील यांच्या विधानावर राजू शेट्टींनीही ‘खरं बोललं तर विषय भलतीकडच जाईल,’ असे सांगितले. त्यावर जयंतरावांनीही ‘खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल ना’ असे प्रत्युत्तर दिले, त्यामुळे शक्तीपीठ विरोधाच्या व्यासपीठावर दोन नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com