Jaysingrao Pawar : '' राज ठाकरेंच्या हातात राज्याची सत्ता गेली तर काहीतरी चांगले होईल..''

Dr. Jaysinghrao Pawar : राज ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहे...
raj thackeray
raj thackeraysarkarnama
Published on
Updated on

Jaysingrao Pawar News : बाळासाहेब ठाकरेंसारखे ठासून बोलण्याची शैली आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहिला तर राज ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहे असं विधान ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांनी केलं आहे. यावेळी राज ठाकरेंसारख्या माणसाच्या हातात जर राज्याची सत्ता गेली तर काहीतरी चांगले होईल अशी अपेक्षा देखील पवार यांनी बोलून दाखविली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कोकण दौर्याची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन केली. यावेळी ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे आणि पवार यांच्यात इतिहास, राजकारण यांसह विविध मुद्दयांवर चर्चा झाली. पवार यांनी इतिहासातील संशोधन आणि लेखनातील योगदानाबद्दल ठाकरेंनी यावेळी कौतुकोद्गार देखील काढले.

बाळासाहेबांसारखे ठासून बोलण्याची शैली तसेच तुमचा प्रामाणिकपणा पाहिला तर तुम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. मात्र, तुम्ही घेत असलेले अनेक उपक्रम हे मध्येच बंद पडतात अशी खंत व्यक्त करतानाच जयसिंगराव पवार यांनी राज ठाकरे यांच्यासारख्या माणसाच्या हातात राज्याची सत्ता गेली तर काहीतरी चांगले होईल असं विधान देखील केलं.

raj thackeray
Satara : राज्यपालांचा माफीनामा नव्हे, राजीनामाच पाहिजे... उदयनराजे

पुढे जयसिंगराव पवार ( Jaysingrao Pawar ) म्हणाले, राज ठाकरे यांना इतिहासाबाबत प्रचंड आस्था आहे. इतिहास लोकांपर्यंत पोहचायला हवा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी अनेक चित्रपटमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असून 'वेडात वीर मराठी दौडले सात' याबाबत देखील चर्चा झाली. या भेटीत पवारांनी छत्रपती ताराराणी यांचा ग्रंथ भेट देत एक वेळेला माझ्याबद्दल बोललं नाही तरी चालेल, मात्र ताराराणी यांच्यावर बोला असं आवाहन देखील राज ठाकरेंना केलं.

raj thackeray
प्रतापगडावर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

...पण राज ठाकरेंच्या पदरी निराशाच!

राज ठाकरे हे नेहमी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून आणि नकलांद्वारे सर्वपक्षीय नेंत्यांवर निशाणा साधत असतात. तसेच अनेकदा आपल्या भाषणातून माझ्या हातात राज्याची सत्ता द्या अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवेन असं आवाहन देखील ते वारंवार जनतेला करत असतात. पण 2007 नंतरच्या निवडणुकांपासून ते आजतागायत मनसेच्या पदरी निराशाच आली. राज ठाकरेंना सत्ता तर सोडा विधानसभेतील आमदारांची संख्या देखील दहाच्या वर नेण्यात अपयश आले. याचमुळे विरोधकांकडून सातत्याने राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते पण तिचं मतात रुपांतर होताना दिसत नाही अशी टीका करण्यात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com