MLA Raju Patil News : विधानसभेची आठवण सांगत राजू पाटलांनी 'आपण नेहमीच तयार असतो' म्हटल्याने, चर्चांना उधाण!

MNS Kalyan-Domviwail News : मनसे लोकसभा निवडणूक लढवणार, राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळव्यातून काय भूमिका जाहीर करणार? आदींबाबत तर्कवितर्क सुरू
MLA Raju Patil
MLA Raju PatilSarakarnama

Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र पाडव्याच्या दोन दिवस आधीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभा 2019 ची आठवण करून देत कधी ही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. राजू पाटलांचे हे विधान काय संकेत देत आहेत याची आता चर्चा होऊ लागली आहे. येत्या पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत घोषणा करणार का? हे आता पहावे लागेल.

लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत असून राज्यात 'मनसे'ने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. गुढीपाडव्याला राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना. कल्याण लोकसभा मतदारसंघ मनसेला सोडल्याचा एक संदेश समाज माध्यमातून व्हायरल झाला आणि मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Raju Patil
MNS Bike Rally : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'MNS'चं डोंबिवली, कल्याण ग्रामीणमध्ये शक्ती प्रदर्शन!

त्यातच रविवारी डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागात मनसेच्या वतीने नवचैतन्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याने ही निवडणुकीची नांदी तर नाही? अशी चर्चा होऊ लागली. दिवा, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि बदलापूर येथील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या मनसेने केल्या असून त्यांचे नियुक्ती पत्रक रविवारी वाटप आमदार राजू पाटील(Raju Patil) यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा हुरूप त्यांनी वाढवल्याचे दिसून आले.

आमदार पाटील म्हणाले, 2019ची विधानसभा निवडणूक आपण लढणार नव्हतो. मात्र राज ठाकरे यांनी सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची आहे. 19 सप्टेंबर 2019 ला राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की कल्याण ग्रामीण विधानसभा तुला लढायची आहे. त्यावेळी राज ठाकरे यांना मी बोललो की मी लंडनला चाललो आहे मुलाला घेऊन. 28 सप्टेंबरला मी येईन तर त्यानंतर तयारी करू आणि निवडणूक होती 24 ऑक्टोबरला म्हणजे जेमतेम आपल्याला 26 दिवस आपल्या हातात असताना आपण तयारी केली आणि पक्षाला एक आमदार देखील निवडून दिला.

MLA Raju Patil
Kalyan Political News : कल्याणच्या भाजप-शिवसेना वादावर अखेर पडदा; आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत...

सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण नेहमी तयार असतो आणि तयार असायलाच पाहिजे. आपण स्वतःला मनसैनिक म्हणवतो सैनिकांनी नेहमी सतर्क असले पाहिजे. राज ठाकरे गुढीपाडव्याला आपल्याला काय सांगतील हे माहीत नाही. मात्र राज ठाकरे जर म्हणाले तयार रहा तर तर त्यांना आपण सांगू शकतो आम्ही तयार आहोत. त्यामुळे त्या तयारीने आपण तयार आहोत आणि आपण तयार असलो तर राज ठाकरे जो निर्णय देतील तो आपल्या पुढे घेऊन जावा लागेल.

परंतु एवढेच सांगतो की गुढीपाडव्याची सभा जोरात करायची आहे. तिथून राज ठाकरे आपल्याला जो आदेश देतील, त्यानुसार आपण पुढची वाटचाल करायची आहे. असे पाटील म्हणाले. राज ठाकरे मनसैनिकांना काय आदेश देतात हे आता पाहावे लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com