Jitendra Awhad On Ajit Pawar: जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा अजितदादांना इशारा; म्हणाले,'बंद मुठी लाख की...'

NCP Political News : “जे शांत झालं ते शांत राहू द्या. नको तिथे चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नका. जे शांत झाले ते शांत राहू द्या ना”, असेही आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad and Ajit PawarSarkarnama

Pune News : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे.मात्र, राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून एकमेकांविरोधात सुरू असलेली हेवेदावे- आरोप-प्रत्यारोपांची धग अजूनही कायम आहे.त्यातच फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांत दिवसागणिक शा‍ब्दिक चकमकी वाढतच चालले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार व नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची प्रमुख बैठक गरवारे क्लब येथे सोमवारी (ता.27)पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुका आणि पक्षाची पुढील रणनीतीवर भाष्य केली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.पुण्यातील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातावरुन त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

Jitendra Awhad and Ajit Pawar
Lok Sabha Election News : महाराष्ट्रात महायुती 35 ते 40 जागांवर जिंकणार; तर महाविकास आघाडी...; कोणी केले 'हे' मोठं भाकीत

आव्हाड म्हणाले, ब्रम्हा कन्स्ट्रक्शनचे संबंध कोणाशी आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील ऑफिस विकत घेण्याचा दबाव टाकून काढून घेण्याचा प्रयत्न कोणामुळे कुठे आणि कसा झाला?अग्रवालचा कसा समावेश आणि सहभाग होता? आपल्या कुठल्या साथीदारांचे प्रयत्न होते? आपल्या साथीदारानं काय सांगितलं? किती रक्कम आणून देतो असं सांगितलं होतं? बंद मुठी लाख की खुल गयी तो खाक की, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला. “जे शांत झालं ते शांत राहू द्या. नको तिथे चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नका. जे शांत झाले ते शांत राहू द्या ना”, असेही आव्हाड म्हणाले.

'नको त्या गोष्टी उकरून काढायला...'

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात किती सख्य होतं हे सगळ्यांना माहिती असून अगोदरचा इतिहास काढत, त्यांचे संदर्भ देत शरद पवारांना (Sharad Pawar) निष्कारण वादात ओढलं जात आहे.मात्र, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि आर आर पाटलांविषयी अजित पवारांचं काय मत होतं? त्यांच्याबद्दल अनेकवेळा खासगी चर्चांमध्ये ते काय काय बोलले आहात.त्यामुळे नको त्या गोष्टी उकरून काढायला नको. त्या रस्त्याला जायची मला गरज मला वाटत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांवर ते का बोलत नाहीत?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर गृहमंत्री पदावरुन निशाणा साधला.ते म्हणाले, या पदाबद्दल अजित पवारांना प्रचंड आकर्षण होतं.पण त्यांना कशामुळे या पदापासून दूर ठेवण्यात आलं, याची आपल्याला माहिती नाही. पुण्यातील अग्रवाल प्रकरण, शरद मोहोळ हत्या, पुण्यातलं गँगवाँर असो, पालकमंत्री असूनही ते या प्रकरणांवर काहीच का बोलत नाहीत? अग्रवाल हे प्रकरण इतकं गंभीर आहे त्यांच्यावर ते बोलताना दिसत नाहीत”, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Jitendra Awhad and Ajit Pawar
Hit And Run Case : उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू ते ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार व्हाया ड्रग्ज रॅकेट! 'ससून' रुग्णांसाठी 'वरदान'की...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com