रायगडाचे पावित्र्य जपा...नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नका!

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलं आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात विविध कारणांवरून वाद निर्माण होत आहेत. त्रिपुरामधील घडनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती (Amravati), मालेगांवसह इतर शहरांमध्ये उमटले होते. त्यावरून अमरावतीत हिंसाचार उफाळून आला होता. त्यातच बुधवारी रायगडावर (Raigad) एक संशयास्पद प्रकार समोर आला आहे.

बुधवारी दुपारी दोन व्यक्ती रायगडावरील शिवसमाधीसमोर पुस्तक पूजन करत असल्याचे दिसून आले होते. त्यांच्याकडील एका डब्यात राखसदृश्य होती. पुस्तकाचे पूजन केले जात होते. या प्रकारानंतर शिवप्रेमींनी महाड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडील राखसदृश पावडर तपासमीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. हे दोघे जण पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

Jitendra Awhad
रुपाली चाकणकर म्हणतात, गरज भासल्यास शेलारांना अटक!

अद्याप ही घटना नेमकी काय होती, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेवरून वाद निर्माण होऊ नये, असं आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. 'रायगडाचे पावित्र्य जपा...नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नका,' असं आवाहन आव्हाड यांनी ट्विटरवरून केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) नुकतेच रायगडावर येऊन गेले. त्यांनी रायगडावर समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. रायगडाला भेट देणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रायगडाला मी तीर्थक्षेत्र मानतो. विसाव्या शतकात गांधीजींनी स्थापन केले हिंद स्वराज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासूनच ते प्रेरित होते. या प्रेरणेतूनच देश अधिक सुबध्द झाला, असं राष्ट्रपती कोविंद म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com