Ncp Crisis : आव्हाड-अजितदादांमध्ये 'ढेरी'वरून जुंपली

Jitendra Awhad On Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर पुन्हा निशाणा...
Ajit Pawar, Jitendra Awhad
Ajit Pawar, Jitendra Awhad Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस फूटमध्ये पडण्यापूर्वीच पक्षात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचे फारसे पटत नव्हते. आता पक्षात फूट पडल्यावर अजित पवार हे शिंदे फडणवीसांसोबत सत्तेत गेले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले आहे. आव्हाड यांनी ट्विट करून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar, Jitendra Awhad
Ncp Crisis : अजित पवार गटाने एक-एक करत जितेंद्र आव्हाडांची सगळी प्रकरणंच बाहेर काढली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबिर झाले. या शिबिरात अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांचे नाव घेत थेट टीका केली होती. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा फोटो ट्विट करून त्यांना डिवचले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ट्विट करत अजित पवारांना सवाल केला आहे.

दादा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलला नसता तर... मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता. मग माझ्यावर दर वेळेस वैयक्तिक टीका कशासाठी? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी हे ट्विट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड यांनी कालही अजितदादांना उद्देशून ट्विट केले होते. कालच्या ट्विटमध्ये त्यांनी अजितदादांची खिल्ली उडवली होती. 'दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो...', अशी टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा एक फोटोही त्यासोबत पोस्ट केला.

Ajit Pawar, Jitendra Awhad
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com