Ruta Awhad: जितेंद्र आव्हाडांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात, कळव्यात कडवे आव्हान!

Thane Election Ruta Awhad Jitendra Awhad: ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा शहरातून राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
Jitendra Awad Wife Ruta Awhad
Jitendra Awad Wife Ruta Awhad Sarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Jitendra Awhad News : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक फोडले. कळव्यातील मिलिंद पाटील यांच्यासह 9 माजी नगरसेवक शिंदेसोबत गेले. मिलिंद पाटील हे आव्हाडांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल जात. त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मध्ये तगडा उमेदवार देत यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची रणनीती जितेंद्र आव्हाड यांनी आखली आहे.

त्यामुळे खुद्द त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. ऋता आव्हाड या प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना सादर केला आहे.

अनेक वर्षपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कळवा शहर ओळखले जाते. याच बालेकिल्ल्याला शिंदेंच्या शिवसेनेने सुरंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आव्हाड यांचे खांदे समर्थक व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी गटनेते प्रमिला केणी, मंदार केणी,  माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला असून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Jitendra Awad Wife Ruta Awhad
Sangli Politics : जावयासाठी सासरा पक्षाच्या विरोधात, सांगलीत कदमांचा धाडसी निर्णय

ऋता आव्हाड टक्कर देणार...

ॠता आव्हाड यांचा कळवा, मुंब्रा भागात दांडगा जनसंपर्क आहे. विशेषतः कळवा परिसरातील त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामामुळे या परिसरातली घराघरा त्या पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक २३ मध्ये शिवसेनेसमोर त्यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे राहणार आहे. ॠता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे वातावरण निर्मिती होऊन पक्षांतर केलेल्या 9 माजी नगरसेवकांना निवडणुकीत मोठा फटका बसून पराभव देखील स्वीकारावा लागणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला.

Jitendra Awad Wife Ruta Awhad
Local Body Election : भाजपकडून मोठी कारवाई! मादनाईकांना कट्टर विरोधकांची मैत्री भोवली, पक्षाने नोटीस धाडत दिली तंबी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com