ED Action : भाजपमध्ये महाप्रवेश करूनही महाराष्ट्रातील नेत्यावर ईडीची कारवाई सुरुच; तब्बल 44 कोटींची मालमत्ता गोठवली

J.M. Mhatre News : पनवेलचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांची 44 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने गोठवली.
ED freezes ₹44 crore worth assets of ex-Panvel Mayor and BJP leader J. M. Mhatre
ED freezes ₹44 crore worth assets of ex-Panvel Mayor and BJP leader J. M. MhatreSarkarnama
Published on
Updated on

J.M. Mhatre News : पनवेलचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांची 44 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने गोठवली आहे. याशिवाय मंगळवारी ईडीने म्हात्रे यांच्या मुंबई, नवी मुंबईतील मालमत्तांवर केलेल्या छापेमारीत 16 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाईत पनवेल तालुक्यातील वनजमीनच्या घोटाळ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागल्याचा दावाही ईडीने केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल तालुक्यातील वनजमीन अवैध संपादन, ती महामार्ग प्रकल्पासाठी हस्तांतरित करणे आणि त्याचा ४२ कोटींचा मोबदला स्वीकारणे, असा आरोप म्हात्रे यांच्यावर आहे. याबाबत गेल्या वर्षी वनविभागाच्या तक्रारीवरून म्हात्रे यांच्यासह दोघांविरोधात पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा आधार घेत ईडीने तपास सुरू केला होता.

या तपासाचा भाग म्हणून, ईडीने मंगळवारी ईडीने म्हात्रे यांच्या मुंबई, नवी मुंबईतील मालमत्तांवर छापेमारी केली होती. यात 16 लाखांची रोकड जप्त केली होती. शिवाय छापेमारीनंतर म्हात्रे हेच या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचे ईडीने जाहीर केले होते. आता म्हात्रे यांच्या जमा, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मिळून 44 कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आल्याचे ईडीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

ED freezes ₹44 crore worth assets of ex-Panvel Mayor and BJP leader J. M. Mhatre
Sanjay Shirsat- Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याविरोधात संजय शिरसाट यांच्याकडून फौजदारी दावा! 24 रोजी सुनावणी

भाजपमध्ये गेल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई थांबते, संथ होते अशी टीका वारंवार होत असते. महिन्याभरापूर्वीच जे. एम. म्हात्रे आणि त्यांचा मुलगा, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्यांच्यावर ईडीची कारवाई अद्याप सुरुच आहे. त्यांची 44 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गोठवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com